‘इतका अहंकार चांगला नाही’; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या ‘त्या’ व्हिडीओवरुन भडकले लोक

Uncategorized

‘ससुराल सीमर का’ फेम अभिनेत्री दीपिका कक्कर तिच्या चांगल्या वागणूकीसाठी ओळखली जाते. ती कायमच आपल्या फोटो आणि व्हिडीओंनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असते. प्रेक्षक कायमच तिच्या ‘डाऊन टू अर्थ’ स्वभावासाठी तिचं कौतुक करत असतात. मात्र यावेळी दीपिकाचं वागणं प्रेक्षकांना खटकलं असून चाहते तिच्या वागण्यावर नाराजी व्यक्त करत आहेत. दीपिकाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये दीपिका एका वक्तीवर भडकली असल्याचं दिसत आहे.

   

दीपिका कक्कर आणि तिचा पती शोएब इब्राहिमनं नुकतीच दादासाहेब फाळके आयकॉन अवॉर्ड सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी ती खूप आनंदी दिसली. मात्र, यादरम्यान दीपिकासोबत एक छोटीशी घटना घडली. इव्हेंटमधून दीपिकाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती हातात मोबाईल घेऊन चालताना दिसत आहे. चालता चालता मध्येच दीपिकाचा तोल जातो आणि पडायला लागते तितक्यात एक व्यक्ती तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो. त्या व्यक्तीने अभिनेत्रीला हात लावताच ती त्याच्यावर भडकते. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्यक्तीने तिची मदत केली तरीही ती त्याच्यावर भडकली असल्यामुळे नेटकरी तिच्यावर संतापले आहेत. व्हिडीओवर कमेंट करत ते दीपिकाला सुनावत आहेत.

अभिनेत्रीचा हा व्हिडिओ ‘सेलिब्रिटी फोटोशूट 01’ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे, जिथे यूजर्स त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, ‘त्याने तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही त्याचा अपमान केला’. दुसर्‍याने लिहिले, ‘धन्यवाद म्हणण्याऐवजी त्याच्याशी गैरवर्तन करणे ही चांगली गोष्ट नाही’. तिसर्‍या यूजरने लिहिले की, ‘इतका अहंकार चांगला नाही’. चौथ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘अनावश्यक वृत्ती… तो खरं तर तिला मदत करण्याचा प्रयत्न करत होता. ती पडली असती तर बरे झाले असते..तिला एकटी राहू द्या.’

हे वाचा:   अभिनेत्रीने शिक्षणासाठी सोडलं बॉलिवूड, आज गुगलमध्ये मोठ्या पदावर कार्यरत

दरम्यान, दीपिका कक्करने अनेक मालिकांमध्ये काम करत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तिचे अनेक चाहते असून ती सोशल मीडियावर सक्रिय असते. याशिवाय ती यूट्यूबवरही तिचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते.

Leave a Reply