दीपिका पदुकोन माझी को-ऍक्टर असेल तरच मी बॉलीवूड मध्ये काम करेल,बांग्लादेशी ‘हिरो”ची इच्छा ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Uncategorized

बॉलिवूडची मस्तानी म्हणजेच दीपिका पदुकोणसोबत चित्रपट करण्याची अनेक हिरोंची इच्छा असते. शाहरुख खानसोबत ओम शांती ओममधील भूमिकेनंतर दीपिक बॉलिवूडमध्ये चांगलीच चर्चेत आली. त्यानंतर, एकापाठोपाठ एक सुपरहीट चित्रपट दिल्यामुळे दीपिकाचा भाव वधारला. विशेष म्हणजे कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनीनेही दीपिका पदुकोण हीच आपले क्रश असल्याचं म्हटलं होतं.

   

तर, कॉमेडियनची कपिल शर्मा नेहमीच दीपिकाच्या नावाने फ्लर्ट करत असतो. त्यामुळे, दीपिकाची लोकप्रियता सर्वपरिचीत आहे. आता, बांग्लादेशमधील सोशल मीडियावरील हिरो, अभिनेता आणि गायक आलमनेही दीपिकासोबत चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

आलम हा आपल्या अभिनयामुळे, सोशल मीडियावरील एक्टीव्हीटीमुळे आणि आता कॉमिक स्टेटमेंटमुळे कायम चर्चेत असतो. साताऱ्यातील अभिजीत बिचुकले हेही बिग बॉसनंतर अशाच विधानामुळे आणि सोशल मीडियातील व्हिडिओमुळे चर्चेत असतात. त्याचप्रमाणे बांग्लादेशचा आलमही अशीच अतिशयोक्तीमुळे चर्चेत आला आहे.

हे वाचा:   पैशांची खूप गरज असेल त्यावेळी बोला हा 1 नंबर पैसा नक्की मिळेल...शास्त्रात सांगितलेला उपाय

हिरो आलमने पुन्हा एकदा धक्कादायक विधान केलं आहे, त्यावरुन तो ट्रोलही होत आहे. बांगलादेशी कलाकार मुर्शिदाबादच्या समशेरगंजमध्ये गर्लफ्रेंड रिया मोनीसोबत तो एका शोमध्ये सहभागी होण्यासाठी गेला होता. कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षकांचे प्रेम पाहून YouTuber आलम चांगलाच भारावून गेला.

त्याचवेळी, त्याने त्याच्या स्वप्नाबद्दलही सांगितले. दोन्ही बंगालमधून प्रेम मिळाल्याचा अभिमान बाळगणाऱ्या या हिरोलाही भारतीय सिनेमात काम करण्याची इच्छा आहे. मात्र, यासाठी आलमची एक अट आहे. आलम म्हणाला, जर दीपिका पदुकोणला त्याच्यासोबत कास्ट करण्यात आलं तरच आपण बॉलिवूडच्या हिंदी चित्रपटात काम करणार आहे. आलमची ही इच्छा किंवा अट ऐकून उपस्थितांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

आलम हा नेहमीच वादग्रस्त ठरला आहे. सोशल मीडियावर ट्रोलिंगसाठी तो लोकप्रिय आहे. बांगलादेशात गाण्याची टिंगल टवाळी, आणि खराब अभिनयामुळे मीम्सचा पाऊस पडतो. सोशल मीडियावर संगीत व्हिडिओच्या रूपात रवींद्र संगीतासह विविध गाण्यांचे चुकीचे वर्णन केल्याबद्दल त्याला या वर्षाच्या सुरुवातीला कायदेशीर नोटीसही बजावण्यात आली होती. आता, या नवीन विधानामुळे तो चर्चेत आला आहे.

हे वाचा:   राजेश खन्ना यांना संपवायचं होतं या कारणामुळे जीवन; मोठं कारण समोर

Leave a Reply