व्वा दादा व्वा’ या एका वाक्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या प्रेमात पाडणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजेप्राजक्ता माळी. प्राजक्ताने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. चाहत्यांमध्ये तिची मोठी क्रेझ पहायला मिळते. प्राजक्ताची कुठलीही पोस्ट असो ती अगदी काही क्षणातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल होते. त्यामुळे चाहते प्राजक्ता कधी एकदा पोस्ट करते आणि आपण कधी त्यावर कमेंटचा वर्षाव करतो, या प्रतिक्षेत असतात. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या प्राजक्ताने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. विशेष गोष्ट म्हणजे या पोस्टवरील चाहत्याच्या प्रश्नानं आणि प्राजक्ताच्या उत्तराने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
प्राजक्ताच्या चुलत भावाचं लग्न असल्यामुळे तिने शूटिंगमधून ब्रेक घेतला असून कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे. भावाच्या लग्नात प्राजक्ता मस्त एन्जॉय करतीये. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत आहे. नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये प्राजक्ताचा मराठमोळा पेहराव सगळ्यांचं मन जिंकत आहे. या फोटोसह प्राजक्ताने म्हटलं, ”भावाच्या लग्नासाठी हवी तशी नऊवार साडी आणि मराठी दागिन्यांसाठी जंग जंग पछाडलं…साडी शिवलेली नाही, नेसलेली आहे..दागिने थेट कोल्हापूरातून आणलेत..तेव्हा कुठे जाऊन look साधला गेला आणि आत्मा सुखावला. ”
प्राजक्ताच्या या पोस्टवर एका चाहत्यानं भन्नाट कमेंट केली आहे. चाहत्याने म्हटलं, ‘करु की नको लग्न मी सांगा’. यावर प्राजक्ताने दिलेलं उत्तर वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही. चाहत्याच्या प्रश्नावर प्राजक्ता म्हणते, ‘करुन टाका, माझा काही भरवसा नाही’. चाहत्यांच्या आणि प्राजक्ताच्या या संभाषाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. याचे स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर फिरत आहेत.
दरम्यान, हिरव्या रंगाच्या नऊवार साडीत प्राजक्ताचं सौंदर्य खुललं आहे. या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिनं पारंपारिक दागिने देखील घातले आहेत. प्राजक्ताच्या या फोटोवर चाहत्यांकडून देखील कमेंटचा वर्षाव होत आहे. नेहमीप्रमाणेच तिचा हा लूक चाहत्यांना भावतो आहे.