‘कुंडली भाग्य’ या हिंदी मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आजही ही मालिका प्रेक्षक आवडीने पाहतात. श्रद्धा आर्या व अंजुम फकीह या अभिनेत्रींची या मालिकेमधील भूमिका तर विशेष गाजली. ऑनस्क्रिन उत्तम काम करणाऱ्या या दोन अभिनेत्री खऱ्या आयुष्यातही एकमेकींच्या तितक्याच जवळच्या आहेत. या दोघींमधील मैत्री नेहमीच दिसून येते. श्रद्धा व अंजुम एकमेकीबरोबरचे फोटोही सोशल मीडियाद्वारे शेअर करताना दिसतात. पण आता अंजुमने श्रद्धाबरोबर शेअर केलेले फोटो एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत.
अंजुमने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे श्रद्धाबरोबर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघीही पोझ देताना दिसत आहेत. शिवाय त्यांचा स्टायलिस्ट लूकही उत्तम आहे. पण या फोटोमधील एक गोष्ट त्यांच्या चाहत्यांना मात्र खटकली. या फोटोवरूनच या दोघींनाही सध्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
या फोटोंमध्ये श्रद्धाने अंजुमच्या स्तनांवर हात ठेवलेला दिसत आहे. या दोघींचा हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अशाप्रकारचे फोटो पोस्ट करणं योग्य नाही असं अनेकांनी म्हटलं आहे. तर काही सेलिब्रिटी मंडळींनी या दोघांच्या फोटोला पसंती दर्शवली आहे.
अंजुमने फोटो शेअर करत म्हटलं की, “आजवर कोणाची एवढी हिंमत नव्हती. एवढा उच्चांक आजवर कोणी गाठलेला नाही. काही लोक माझ्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतील. पण प्रेमाने मला फक्त एकच गोष्ट कळते की माझ्या स्तनांवर फक्त तुझाच अधिकार आहे. ” तसंच श्रद्धा माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असंही अंजुमध्ये म्हटलं आहे.