स्मृती इराणींनी स्वत: केले चुरमा लाडू, बघा खास रेसिपी- आणि पौष्टिक चविष्ट लाडू

Uncategorized

सध्या थंडी चांगलीच सुरू झाली असून आता घरोघरी थंडीसाठीचे पारंपरिक पौष्टिक लाडू (winter special ladoos) करण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे अनेक गृहिणी सध्या सुकामेवा, डिंक, मेथ्या यांची खरेदी करण्यात गुंतलेल्या आहेत. केंद्रिय मंत्री स्मृती इराणीदेखील या बाबतीत अजिबात मागे नाहीत. त्यामुळेच तर या वाढत्या थंडीत स्वत:चे आणि कुटूंबियांचे आरोग्य सांभाळण्यासाठी त्यांनी चुरमा लाडू (Gujarati choorma ladoo recipe) बनवून ठेवले आहेत. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मिडियावर चांगलीच गाजते आहे.

   

चुरमा लाडू हा एक गुजराथी पदार्थ असून हे लाडू अतिशय पौष्टिक असतात. त्यामुळे गुजराथी लोक प्रवासात हा चुरमा लाडू आवर्जून सोबत ठेवतात. थंडीमध्ये खाण्यासाठीही हे लाडू अतिशय चांगले मानले जातात.

हे वाचा:   राखी सावंतच्या मदतीसाठी सलमान खान नेहमी पुढे का येतो? काय आहे दोघांचं नातं, जाणून घ्या

स्मृती इराणी यांनी दोन- तीन दिवसांपुर्वी इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. यामध्ये जो फोटो दिसत होता, त्यात एक परातीत काही चुरमा लाडू ठेवले होते आणि एक लाडू त्या हाताने वळत होत्या. ‘making my stock of choorma ladoos’ अशी कॅप्शनही त्यांनी या स्टोरीला दिली होती. गव्हाचे पीठ म्हणजेच कणिक, गूळ आणि तिळ हे ३ मुख्य पदार्थ असलेला पौष्टिक चुरमा लाडू तुम्हालाही करून पहावा वाटत असेल तर ही बघा रेसिपी.

कसा करायचा चुरमा लाडू?
१. चुरमा लाडू करण्यासाठी २ वाट्या कणिक, ४ टेबलस्पून तूप आणि अर्धा कप गरम पाणी असं मिश्रण एकत्र करून भिजवून घ्या.

२. कणिक १५ ते २० मिनिटे भिजू द्या. त्यानंतर त्याचे ८ गोळे करा आणि कढईमध्ये तूप किंवा तेल टाकून ते सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतून घ्या.

हे वाचा:   प्रिती झिंटाने खूप दिवसांनी उघडले तिच्या आणि युवराज सिंगच्या नात्याचे गुपित, म्हणाली- 'युवराज आणि मी दोघे...', जाणून घ्या सत्य

३. तळलेले कणकेचे गोळे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून फिरवून बारीक करून घ्या. नंतर ते एका बाऊलमध्ये काढा. त्यात १ वाटी गुळाचा पाक आणि अर्धा कप तूप घाला. सगळे मिश्रण व्यवस्थित मळून घ्या आणि त्याचे लाडू बांधा. 

Leave a Reply