Video : आधी मांडीवर बसली, त्याने घट्ट मिठी मारली अन्…; ‘बिग बॉस’च्या घरात गौतम-सौंदर्याचा उघडपणे रोमान्स, व्हिडीओ व्हायरल

Uncategorized

‘बिग बॉस १६’ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या भागामध्ये शालीन भानोत व टीना दत्ता एकमेकांच्या अधिक जवळ आलेले दिसले. इतकंच नव्हे तर हे दोघं मध्यरात्री बराच वेळ बाथरुममध्ये एकत्र असल्याचंही दिसून आलं. आता या घरामधील आणखी एक कपल अगदी उघडपणे रोमान्स करताना दिसत आहेत. गौतम विग व सौंदर्या शर्मा एकमेकांच्या अगदी जवळ आले आहेत. यादरम्यानचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

   

‘बिग बॉस १६’च्या घरात रोमान्स
गौतम विग व सौंदर्या शर्माही याआधी एकत्र बाथरुममध्ये जाताना दिसले. यावेळी सलमान खानने या दोघांना चांगलंच सुनावलं होतं. आता तर उघडपणे दोघं एकत्र रोमान्स करत आहेत. यादरम्यानचा एक व्हिडीओ हिंदी कलर्स वाहिनीने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

हे वाचा:   मलायका लग्नाआधीच झाली गरोदर, घटस्फोटानंतर होणार अरबाज खानच्या मुलाची आई, अर्जुन कपूरला बसला धक्का

पाहा व्हिडीओ

या नव्या व्हिडीओमध्ये सोंदर्या गौतमच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. गौतमही तिला घट्ट मिठी मारतो. दरम्यान दोघंही एकमेकांच्या अगदी जवळ येतात आणि किस करतात. पण या दोघांचा रोमान्स पाहून अब्दू रोजिक मात्र भलताच लाजतो. तो शिव ठाकरेला गौतम-सौंदर्याच्या रोमान्सबाबत सांगतो.

गौतम-सौंदर्याला पाहून दोघंही त्यांची मस्करी करू लागतात. तसेच शिवही अब्दूला मांडीवर घेऊन बसतो आणि दोघांची नक्कल करू लागतो. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून खोट्या प्रेमापेक्षा शिव-अब्दूची जोडी बेस्ट आहे अशा कमेंट प्रेक्षकांनी केल्या आहेत.

Leave a Reply