कंगनाने लता मंगेशकरांशी केली स्वतःची तुलना; म्हणाली- ‘मी कधीच पैसे घेऊन लग्नात नाचले नाही…’

Uncategorized

कंगना रनौत हे बॉलिवूडमधील असं नाव आहे जे नेहमी आपल्या वक्तव्यामूळं चर्चेत असतं. कंगणा कधी कूणाबद्दल काय बोलेल याचा भरोसा नाही. कधी ती कुणाला झाडते तर कधी कुणाच्या कौतुकाचा वर्षाव करते. आता तर तिने काही वेगळंच केलयं. तिने तिची तुलना चक्क भारतरत्न लता मंगेशकर यांच्याशीच स्वत:ची तुलना केली आहे.

   

कंगना राणौतने नुकताच इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये गायिका आशा भोसले दिवंगत गायिका लता मंगेशकर यांच्याबद्दल बोलत आहेत. व्हिडीओमध्ये आशा भोसले सांगत आहेत की, लता मंगेशकर कधीही लग्नसमारंभात गात नाही गायच्या. त्यांना कितीही पैसे देऊ केले तरी त्या लग्नात कधीच गायच्या नाहीत. हा व्हिडिओ शेअर करताना कंगना राणौतने सांगितले की, ती देखील असेच करते.

हे वाचा:   या कारणामुळे ऐश्वर्या रायने केला स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न, सत्य आलं समोर

कंगनाने शेअर केलेल्या या व्हिडिओत डान्स इंडिया डान्स लिल मास्टरच्या स्टेजवरचा आहे. ज्यामध्ये आशा भोसले सहभागी झाल्या होत्या. लतादीदींनी एकदा लग्नात दोन तासांच्या परफॉर्मन्ससाठी एक मिलीयन डॉलर्सची ऑफर त्यांनी कशी नाकारली हे त्यांनी सांगितले. या घटनेची आठवण करून देताना आशा म्हणाल्या, “तिला 5 मिलियन डॉलर्सची ऑफरही आली होती, तेही ऑफरही ती नाकारायची. ते कलाकारामध्ये असलं पाहिजे.”

व्हिडिओ शेअर करताना कंगनाने लिहिले, “याच्याशी सहमत! माझ्याकडे सर्वाधिक लोकप्रिय गाणी असूनही मी लग्न किंवा एखाद्या खाजगी पार्ट्यांमध्ये कधीही नाचले नाही. मोठी रक्कमेलाही नाही म्हटलं. व्हिडिओ पाहून आनंद झाला. लताजी खरंच खूप प्रेरणादायी आहेत.”

Leave a Reply