जान्हवी कपूर पुन्हा करतेय महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाला डेट? व्हिडीओ व्हायरल

Uncategorized

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. मागच्या काही काळापासून ती तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. जान्हवी मागच्या काही दिवसांपासून सातत्याने एक्स बॉयफ्रेंड शिखर पाहारियाबरोबर कुठे ना कुठे दिसत आहे.

   

आताही त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर जान्हवी आणि शिखर पुन्हा एकदा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

‘इ-टाइम्स’ दिलेल्या वृत्तानुसार जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया पुन्हा एकदा एकमेकांना डेट करत आहेत. जान्हवीच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “काही महिन्यांपूर्वीच जान्हवी आणि शिखर यांनी पुन्हा एकमेकांशी बोलायला सुरुवात केली. त्यानंतर काही काळाने त्यांनी त्यांच्या नात्याला नव्याने आणखी एक संधी देण्याचा विचार केला आहे.” त्यानंतर आता जान्हवी कपूर आणि शिखर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हे वाचा:   वयाच्या 42 व्या वर्षी अभिनेत्री श्वेता तिवारीचा बोल्ड लुक,फोटो पाहून चाहते थक्क,पाहा Photos

२९ डिसेंबरला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्याची पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये जान्हवी कपूरही उपस्थित होती. यावेळचा तिचा आणि शिखर पाहारियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी गुलाबी रंगाच्या साडीमध्ये पार्टीमध्ये येताना दिसत आहे.

तर शिखर तिला घेण्यासाठी बाहेर येतो आणि मग ते दोघंही एकत्र आत जातात असं दिसत आहे. हा व्हिडीओ विरल भयानी यांनी त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅन्डलवरून शेअर केला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी शिखर आणि जान्हवी अनिल कपूर यांच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्येही एकत्र दिसले होते. यावेळी शिखर आणि बोनी कपूर यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पाहारिया यांचा तो मुलगा आहे. रिपोर्टनुसार, त्याने जान्हवी कपूर कपूरला डेट केले आहे. मात्र, काही काळानंतर दोघे वेगळे झाले.

हे वाचा:   अनिल कपूरच्या एका कृत्यामुळे जोरजोरात ओरडली होती माधुरी, कॅन्सल केलं होतं गाण्याचं शूटींग

करण जोहरने त्याच्या ‘कॉफी विथ करण ७’ या शोमध्ये दोघांमधील नात्याची पुष्टी केली होती. याआधीही जान्हवी कपूर आणि शिखर मुंबईत बऱ्याचदा एकत्र दिसले आहेत. जान्हवी कपूर आणि शिखर २०१६ मध्ये एकमेकांना डेट करत होते. मात्र, श्रीदेवीच्या ‘नो डेटींग क्लॉज’मुळे जान्हवी तिच्या अभिनय कारकीर्दीवर लक्ष केंद्रित करू शकली म्हणून या दोघांना तेव्हा वेगळं व्हावं लागलं.

Leave a Reply