जेवणातून भात आणि चपाती पूर्णपणे बंद केल्यावर खरंच फायदा होतो? या पदार्थांना पर्याय कोणता?

Uncategorized

सध्या बोटांवर मोजण्या इतकेच लोकं असतील ज्याची लाईफस्टाईल (Lifestyle) योग्य असेल. वजन कमी (Weight loss) व्हावं, फीट राहावं यासाठी अनेकजण डाएटचा (Diet) पर्याय निवडतात. या डाएटनुसार, गव्हाची चपाती (Wheat Roti) आणि भात (White rice) यांना तुमच्या ताटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येतो. कारण भात आणि गव्हाची चपाती यांच्यामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स (Carbohydrates) असतात. मात्र तुम्ही कधी विचार केलाय का जेवणातून भात आणि चपाती पूर्णपणे बंद केल्यावर खरंच चांगले परिणाम होतात का?

   

भात आणि चपाती जेवणातून बंद केल्यावर होणारे फायदे

इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या एका अहवालानुसार, आहारातील कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी केलं तर टाइप-2 मधुमेहाचा धोका होण्याची शक्यता कमी होते. आपण घेत असलेल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण भरपूर असतं. तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, मधुमेह आणि स्थूलपणा वाढण्याचं हेच मुख्य कारण आहे. त्यामुळे तुमच्या आहारातील कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी करावं.

हे वाचा:   Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात शिव ठाकरेचा रुद्रावतार; निम्रतवर 'असा' काढला राग

एका संशोधकांनुसार, भारतीय लोकांच्या आहारात 65-70 % कार्बोहायड्रेट्स असतात. तर यामध्ये केवळ 10% प्रथिनांचा समावेश असतो आणि 20% स्निग्ध पदार्थ असतात. तज्ज्ञांच्या मताप्रमाणे, भारतीयांनी त्यांच्या आहारातील कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण 55 टक्क्यांपर्यंत पर्यंत खाली आणलं पाहिजं. तर दररोज प्रथिनांचे प्रमाण 20 टक्क्यांपर्यंत वाढवणं गरजेचं आहे.

कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण आहारातून पूर्णपणे कमी करावं?

आपल्या शरीरासाठी कार्बोहायड्रेट्स हे आवश्यक असतात. एखाद्या व्यक्तीचा शरीराचा प्रकार तसंच आरोग्याची परिस्थिती याप्रमाणे कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण हे असतं, असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे तुमच्या आहारातून इन्स्टंट फूड्स, चिप्स, कोल्ड ड्रिंक्स, समोसा, पिझ्झा आणि बर्गर यांच्यासारखे पदार्थ वगळावेत. 

कार्बोहायड्रेट्सना पर्याय म्हणून आहारात कशाचा समावेश कराल?

कार्बोहायड्रेट्सच्या जागी तुम्ही तुमच्या आहारामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी यांचा समावेश करू शकता. याचे तुमच्या शरीराला होणारे फायदे देखील अनेक आहेत. तर काहींना भात खाल्ल्याशिवाय जेवल्यासारखं वाटत नाही. अशावेळी तुम्ही भाताला पर्याय म्हणून ब्राऊन राईसचा समावेश करू शकता.

Leave a Reply