जेवणात केस निघाल्याने पतीचं राक्षसी कृत्य; पत्नीचे हातपाय बांधले अन् सगळ्यांसमोरच…

Uncategorized

अनेकदा घरामध्ये किंवा बाहेर आपण जेवण करण्यासाठी जातो, तेव्हा आपल्याला जेवणाच्या ताटामध्ये केस दिसतो. खरं तर हे कोणालाच आवडत नाही. मात्र, एका व्यक्तीने जेवणात केस सापडल्याने आपल्या पत्नीसोबत असं काही केलं जे वाचून तुमच्या अंगावर काटा येईल.

   

ही घटना उत्तर प्रदेशच्या पीलीभीतमधील आहे. यात पतीने छोट्या गोष्टीसाठी आपल्या पत्नीसोबत अतिशय धक्कादायक कृत्य केलं.

पीडितेचं म्हणणं आहे, की तिचा पती जेवण करत होता. तेव्हा जेवणात केस निघाला. हे पाहून महिलेचा पती चांगलाच भडकला. महिलेनं पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटलं, की तिच्या पतीने तिला शिवीगाळ केली. तिचे हातपाय बांधून जबरदस्ती संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर याचा विरोध केल्याने तिचे केसच काढून टाकत टक्कल केला.

हे वाचा:   TMKOC : `तारक मेहता` मालिकेत नव्या टप्पूची एन्ट्री , हा अभिनेता घेणार राज अनादकटची जागा

महिलेचा आरोप आहे, की तिचा पती तिच्यासोबत हे सगळं करत असताना तिच्या सासूने आणि दिराने तिथेच उभा राहून हे सगळं फक्त बघत राहाण्याचं काम केलं. इतकंच नाही तर ते महिलेच्या पतीला आणखी भडकवत राहिले.

महिलेचं म्हणण आहे, की तिने फोन करून माहेरकडच्या लोकांना या घटनेची माहिती दिली. मात्र, माहेरकडचे लोक घरी पोहोचताच पतीने त्यांनाही मारहाण करण्याचा प्रयत्न केला.

महिलेचा असाही आरोप आहे, की तिचा पती हुंड्याची मागणीही करतो आणि तिला मारहाणही करतो. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी पती, सासू आणि दिराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. महिला आपल्या माहेरी गेली आहे.

Leave a Reply