‘दुनियादारी चित्रपटातील शिरीनचा रोल माझा होता, पण…’; या अभिनेत्रीनं केला गौप्यस्फोट

Uncategorized

दुनियादारी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयानं तसेच चित्रपटाच्या कथानकानं प्रेक्षकांची मनं जिंकली. दुनियादारी (Duniyadari) हा चित्रपट 2013 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट रिलीज होऊन नऊ वर्ष झाली तरी देखील आजही प्रेक्षक हा चित्रपट आवडीनं बघतात.

चित्रपटात अभिनेत्री सई ताम्हणकरनं (Sai Tamhankar) शिरीन ही भूमिका साकारली आहे. पण सईच्या आधी या चित्रपटाची ऑफर अभिनेत्री तेजस्विनी पंडितला (Tejaswini Pandit) देण्यात आली होती. याबाबत सौमित्र पोटे यांच्या पोडकास्ट शोमध्ये तेजस्विनीनं सांगितलं.

काय म्हणाली तेजस्विनी?
सौमित्र पोटे यांच्या पॉडकास्टमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडितनं सांगितलं, ‘दुनियादारी चित्रपटातील शिरीनची भूमिका माझी होती. जर ती भूमिका मी साकारली असती तर आज मी कदाचित वेगळ्या ठिकाणी असते. संजय जाधव हे जर आज हा पॉडकास्ट ऐकत असतील तर त्यांनी मला सांगावं की काय झालं तेव्हा की माझं कास्टिंग काढून तुम्ही सईला चित्रपटात घेतलं.

हे वाचा:   पैशांची खूप गरज असेल त्यावेळी बोला हा 1 नंबर पैसा नक्की मिळेल...शास्त्रात सांगितलेला उपाय

16 डिसेंबरला माझं लग्न होतं. 20 तारखेला फिल्म ऑनफ्लोर जाणार होती. संजय सरांनी सांगितलं की, मेहंदी काढायची नाही. मी मेहंदी पण नाही काढली. त्यानंतर 8 डिसेंबरला माझ्या वडिलांनी पेपरमध्ये ही बातमी वाचली की, दुनियादारी चित्रपट येणार आहे. त्यात कास्टिंगबाबत देखील लिहिण्यात आलं होतं. यामध्ये माझं नाव नव्हतं. मी सगळ्यांना फोन केले होते. पण तेव्हा मला कोणी निट उत्तरं दिली नाहीत.’

अंकुश चौधरी, स्वप्निल जोशी, सुशांत शेलार, जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, उर्मिला कानेटकर, रिचा परीयाली यांनी दुनियादारी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय जाधव यांनी केलं होतं.

तेजस्विनीचे चित्रपट आणि वेब सीरिज

हे वाचा:   अक्षय कुमारसोबत काम केलेला हा अभिनेता आज करतोय सिक्युरिटी गार्डची नोकरी; नाव ऐकून हादरून जाल.!

तेजस्विनीची रानबजार ही वेब सीरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या सीरिजमधील तेजस्विनीच्या अभिनयानं अनेकांनी कौतुक केले. आता ‘अथांग’ या वेब सीरिजमधून तेजस्विनी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘मी सिंधुताई सपकाळ’, देवा, तू हि रे या चित्रपटामधून तेजस्विनी प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.

Leave a Reply