पत्र्याच्या घरात छापल्या 10 कोटींच्या नोटा; माय-लेकाचा प्रताप पाहून पोलीस झाले शॉक

Uncategorized

Duplicate currency note Print : देशभरातील अनेक ठिकाणी टोळ्यांनी नोटा छापल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेतील आरोपींना अटक देखील झाली आहे. मात्र आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका पत्र्याच्या घरात 10 कोटीच्या नकली नोटा छापल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या नोटा कोणतीही टोळी नव्हे तर एका माय-लेकाने छापल्या आहेत. त्यामुळे ही घटना पाहून पोलिसही चक्रावले आहे. 

10 कोटीच्या नोटा छापल्या 

आई मंजू आणि मुलगा सुरज या दोघा माय-लेकाने मिळून त्यांच्या पत्र्याच्या घरात 10 कोटीच्या नकली नोटा छापल्या असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. पोलिसांनी आणि नॅशनल काउंटरफिट करन्सी एजन्सीने नोटा चलनात आल्यावर चौकशी केली असता ही घटना उघड झाली होती.

हे वाचा:   मलायकाचे ग्लॅमरस कपडे ठरले घटस्फोटाचं कारण? अरबाज खानने स्वतः सांगितलं सत्य

घरावर छापा 

दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच आरोपी माय-लेकाच्या घरावर छापा टाकण्यात आला होता. या छाप्यात अधिकाऱ्यांना 2 कोटीच्या नकली नोटा सापडल्या होत्या. यासोबतच आरोपीच्या दुसऱ्य़ा ठिकाणावर नोटा छापण्यासाठी लागणारे डाय, प्रिटर्स मशीनही सापडले होते.

नोटा छापून करायचे काय? 

या घटनेत पोलिसांनी माय-लेकाची कसून चौकशी केली असता, त्यांनी 10 कोटीच्या नकली नोटा छापल्याची माहिती समोर आली होती. तसेच माय-लेक या नकली नोटा छापून त्या अंडरवर्ल्ड गँगच्या लोकांना विकायचे. अंडरवर्ल्ड गँग हे पैसै गुन्ह्यासाठी वापरायची,अशी माहिती समोर आली. 

न्यायालयाने सुनावली शिक्षा

आई मंजू आणि मुलगा सुरज या दोघा माय-लेकाने पोलिसांनी अटक केली होती. या अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने 14 डिसेंबरला या दोघांच्या प्रकरणावर सुनावणी घेतली. या सुनावणीत आईला साडे सहा वर्षांची शिक्षा सुनावली, तर मुलाला 2 वर्ष बाल कारागृहात ठेवण्यात येणार आहे.  

हे वाचा:   इथे मुलीसाठी स्वतः खोली सजवतो बाप; लग्नाआधी 10 मुलांसोबत घालवते रात्र, कारण वाचून वाटेल कौतुक

मध्य प्रदेशात ही घटना घडलीय. हा घटनाक्रम वाचून अनेकांना धक्का बसला आहे. 

Leave a Reply