पाणी पुरी की पिठलं भाकरी? देशमुखांच्या सुनेला आवडतात या गोष्टी

Uncategorized

मराठी आणि हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप सोडणार सर्वाचा लाडका अभिनेता रितेश देशमुख आणि सर्वांच्या लाडक्या वहिनी म्हणजे अभिनेत्री जिनिलीया देशमुख. दोघांचा आगामी मराठी चित्रपट ‘वेड’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु असून चाहते या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत. रितेश-जिनिलीयाही चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहेत. नुकतंच रितेश जिनिलियाने ‘वेड’ चित्रपटाच्या निमित्तानं न्यूज 18 लोकमतशी एस्क्लुझिव्ह गप्पा मारल्या. दोघांनीही अनेक गोष्टी शेअर केल्या.

   

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुखने ‘वेड’ च्या निमित्तानं एका वाहिनिशी संवाद साधला. यावेळी जिनिलियाला पाणी पुरी की पिठलं भाकरी नक्की खायला काय आवडतं याविषयी रितेशनं सांगतिलं. रितेश म्हणाला यांना पाणी पुरी वगैरे खायला आवडतं मात्र लातूरला गेल्यावर जिनिलीयाला पिठलं भाकरी, मिरचीचा ठेचा, शेंगदाण्याची चटणी, काळ्या पसाल्याची आमटी, भगर अशा सगळया गोष्टी आवडतात.

हे वाचा:   काहीही झाले तरी या तीन देवतांचे घरात पूजन करू नका होईल फक्त आणि फक्त बरबादी

एकत्र काम करताना अभिनय, डिरेक्शन, प्रॉडक्शन हे सगळी कामं कशी बॅलन्स करता याविषयी जिनिलिया म्हणते असा माणून हवा ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. तर जेव्हा रितेश डिरेक्शन करतात तेव्हा मी मदत करते. रितेश म्हणतो, नीट शूट करण्यासाठी जो समज हवाय तो तिच्याकडे आहे. त्यामुळे डिरेक्टर म्हणून मला चांगलं वाटतं.

दरम्यान, अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजा यांचा ‘वेड’ चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा अपूर्ण राहिलेल्या प्रेमाभोवती फिरते. या चित्रपटाच्या टीझरलाही प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. ‘वेड’ चित्रपटातून रितेश दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन रितेशनं केलं असून तो आणि जिनिलिया मुख्य भुमिकेत झळणार आहे. वेड चित्रपटातून अभिनेत्री जिनिलीया देशमुख मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे. खूप काळानंतर जिनिलीया मोठ्या पडद्यावर पुनरागमनासाठी सज्ज झाली आहे. आता दोघांची केमिस्ट्री मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत.

Leave a Reply