“बाळासाहेब ठाकरेंमुळेच आज मी…” ‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंतचा मोठा खुलासा

Uncategorized

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिॲलिटी शो म्हणजे ‘इंडियन आयडल.’ इंडियन आयडलचे पहिले पर्व गायक अभिजीत सावंतने जिंकले होते. ही स्पर्धा जिंकल्यानंतर त्याला अनेक गाण्यांच्या ऑफर आल्या होत्या. यामुळे त्याचे आयुष्य रातोरात बदलले होते. तो कायमच त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देत असतो. नुकतंच त्याने एका मुलाखतीत शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची एक आठवण सांगितली. यावेळी त्याने बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला कानमंत्रही सांगितला.

   

अभिजीत सावंतने नुकतंच‘बीबीसी मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी त्याला मराठी संस्कृती, करिअर याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्याने त्याला याचा काय फायदा झाला आणि काय तोटा झाला याबद्दल खुलासा केला. यावेळी त्याने सिनेसृष्टीतील काही गोष्टींबद्दलही भाष्य केले.

अभिजीत सावंतला यावेळी मराठी संस्कृतीबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी तो म्हणाला, मी मराठी असल्याचा मला खूप फायदा झाला. मराठी संस्कृती याचाही मला फायदा झाला. कारण मराठी कलाकारांना कधीच जास्त प्रसिद्धी दिली जात नाही. त्यांन जास्त उडू दिलं जात नाही. त्या सर्वांनाच ठिक आहे, असंच म्हटलं जातं.

हे वाचा:   Urfi Javed च्या अंगावर एकही कपडा नाही; शरीरावर चक्क गुंडाळली सायकलची चैन- व्हिडिओ व्हायरल

त्यापुढे बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगताना तो भावूक झाला. “माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला सर्वात जास्त पाठिंबा दिला. त्यांनीच माझी सुरुवात ही करुन दिली. एक दिवस त्यांनी मला त्यांच्या घरी बोलवलं. इंडियन आयडल जिंकल्यानंतर मी त्यांच्या घरी गेलो. त्यांनी मला अनेक चांगले कानमंत्र दिलं. त्यावेळी त्यांनी मला योग्य वेळी योग्य ते मार्गदर्शन केले. माझ्या यशामागे त्यांचा मोठा हात आहे. यापुढचा प्रवास आपला कसा असायला हवा, याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे मराठी संस्कृती आणि मराठी माणूस एकमेकांना ज्याप्रकारे मदत करतो त्याचा मला फार मोठा फायदा झाला”, असे त्याने सांगितले.

दरम्यान मला कार्यक्रम संपल्यानंतर अनेक वाईट अनुभव आले. शो मोठा असल्याने लोकांनी स्वतःचं स्वतःची मतं बनवली होती. जेव्हा शो सुरु होता तेव्हा आमच्यासोबत एक पीआर एजंट होता. त्यावेळी आमच्याबद्दल चांगले लेख, बातम्या छापल्या जायच्या. पण जसं शो संपला आणि मी खऱ्या जगात आलो तेव्हा मात्र मीडिया आणि लोक फार बदलले होते, असेही त्याने म्हटले.

Leave a Reply