‘रंग माझा वेगळा’ मालिकेत जिनिलिया डिसुझाची एंट्री; साधी भोळी अभिनेत्री चाहत्यांना लावणार ‘वेड’

Uncategorized

छोट्या पडद्यावरील मालिका ‘रंग माझा वेगळा’ कायम टीआरपीच्या यादीत पहिल्या पाचमध्ये असते. या मालिकेची कथा आणि कलाकार दोन्हीही प्रेक्षकांचे अत्यंत आवडते आहेत. मालिकेतील दीपा आणि कार्तिकची जोडीही प्रेक्षकांची आवडती आहे. सध्या मालिकेत ते दोघे वेगळे राहत असल्याचं चित्र आहे. त्यात कार्तिकही पुन्हा एकदा फर्टिलिटी टेस्ट करण्यास नकार देत आहे.

   

मात्र आता हे चित्र बदलण्यासाठी मालिकेत एका खास पाहुणीची एंट्री होणार आहे. कार्तिक आणि दीपा यांच्यातील दुरावा मिटवण्यासाठी लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया डिसुझा ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत धमाकेदार एण्ट्री करणार आहे.

जिनिलिया लवकरच ‘वेड’ या मराठी चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. तिच्यासोबत या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुख मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट ‘माझिली’ चा रिमेक असल्याचं म्हटलं जातंय. हा चित्रपट ३० डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जिनिलिया या मालिकेत झळकणार आहे.

हे वाचा:   या प्रसिद्ध अभिनेत्रीला आपण ओळखलंत का? जिनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय...

ती या मालिकेत पाहुणी कलाकार म्हणून दिसणार आहे. कार्तिक अजूनही फर्टिलिटी टेस्ट करून घेण्यास नकार देत आहे. ज्यावर दीपा आणि त्यांच्या मुलींचं भवितव्य अवलंबून आहे. मात्र आता जिनिलिया त्याला भेटून खऱ्या प्रेमाचा अर्थ समजावून सांगणार आहे. तिचा शूटिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात ती अगदी साध्या कपड्यात दिसत आहे. तिने पिवळ्या रंगाची सुती साडी नेसली आहे.

जिनिलियाचा चित्रीकरण करतानाचा एक व्हिडिओ चाहत्यांमध्ये व्हायरल होतोय. या व्हिडिओत ती कार्तिकसोबत बोलते, चालत येते आणि कॅमेरासमोर पोज देताना दिसतेय. चाहत्यांनी या व्हिडिओवर लाइक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तिला मालिकेत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत.

जिनिलियाचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. तिचा साधेपणाचं चाहत्यांना प्रचंड भावतो. आता तिच्या मालिकेतील एण्ट्रीने ती पुन्हा एकदा चाहत्यांना वेड लावायला सज्ज झाली आहे. त्यामुळे चाहते या भागाची ऊत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Leave a Reply