52 वर्षीय महिला पडली 21 वर्षीय तरूणाच्या प्रेमात, लग्न करून म्हणाले – प्रेमात वयाचं बंधन नसतं

Uncategorized

Love Story : असं म्हणतात की, प्रेमात सगळं काही माफ असतं आणि जर प्रेम खरं असेल तर जगातील लोकांचा काही फरक पडत नाही. जर एखादी व्यक्ती प्रेमात पडली तर ती जात-पात, वय काहीच बघत नाही. ती व्यक्ती आपलं मन आपल्या पार्टनरच्या हवाले करते. अशा अनेक घटना समोर येत असतात ज्यात कपलच्या वयात फार अंतर असतं. पण त्यांना या गोष्टीची काही चिंता नसते. पण जेव्हा सामान्य लोक या घटनांबाबत वाचतात तेव्हा हैराण होतात. सोशल मीडियावर एक अशीच घटना व्हायरल झाली आहे. एका तरूणाने त्याच्यापेक्षा 31 वर्षाने मोठ्या महिलेसोबत लग्न केलं आणि त्यांचं मत आहे की, प्रेमाला वयाचं बंधन नसतं.

   

 52 वर्षीय मुलीच्या प्रेमात पडला 21 वर्षाचा तरूण

हे वाचा:   बिग बींच्या घरात ही अभिनेत्री आहे भाडेकरु, सामान्य माणूस घरासाठी जितकं लोन काढतो तितकं एका महिन्याचं भाडं

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक 21 वर्षाचा तरूण लग्नाच्या स्टेजवर उभा आहे आणि त्याच्यामागे एक लग्नातील खास चेअर दिसत आहे. दोघांच्या गळ्यात हार आहेत. कुणीतरी तरूणाला विचारलं की, तुम्ही लग्न केलं का? तर तरूण हो म्हणाला. व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीने तरूणाला त्याचं वय विचारलं तर त्याने 21 सांगितलं आणि महिलेचं वय 52 आहे. समोरच्या एका व्यक्तीने विचारलं की, भावा तू योग्य केलं का. तर तरूण म्हणाला की, प्रेमाला वयाचं बंधन नसतं. ते कधीही होऊ शकतं.

व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीने विचारलं की, तुम्ही या लग्नाने आनंदी आहात का? महिला म्हणाली की, हो आनंदी आहे. आम्ही दोघेही आनंदी आहोत. मला माझ्यापेक्षा जास्त त्याच्यावर विश्वास आहे. कारण मी तीन वर्ष त्याला पाहिलं आहे. तर तरूण यावर म्हणाला की, प्रेमाला वयाचं बंधन नसतं. फक्त मन बघितलं जातं. व्यक्ती चांगली असली तर सगळं चांगलं असतं. 

हे वाचा:   आठ वर्षांचा संसार, पहिल्या पत्नीशी घटस्फोट, एक मुलगी अन्…; नवीन ‘तारक मेहता’ने थाटामाटात केलं दुसरं लग्न, फोटो व्हायरल

फेसबुक हा व्हिडीओ शेअर केल्यावर तो व्हायरल झाला आहे. अमित चतुर्वेदीच्या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 22 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहे. हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलेलं नाही.

Leave a Reply