बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza) हीचा आज वाढदिवस आहे. दिया तिचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्त तिच्यावर बॉलिवूडमधून (bollywood) शुभेच्छा वर्षाव होत आहे. अनेक अभिनेते- अभिनेत्री तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. दिया मिर्झा (Dia Mirza Birthday) तिच्या बॉलिवूड सिनेमातील अभिनयापेक्षा वादांमुळे खुप चर्चेत राहिली होती. हे वाद नेमके कोणते होते? ज्यामुळे तिची सर्वाधिक चर्चा झाली होती, हे जाणून घेऊयात.
बॉलिवूडची अभिनेत्री दिया मिर्झा (Dia Mirza Birthday) पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर केलेल्या ट्विटमुळे आणि प्रेग्नेंन्सीमुळे खुप चर्चेत आली होती. तिच्या अभिनयापेक्षा या वादामुळे ती खुप चर्चेत आली होती.
प्राइवेट पार्टवर ट्विट
दिया मिर्झाने (Dia Mirza Birthday)15 फेब्रुवारी 2021 रोजी वैभव राखी या व्यक्तीसोबत लग्न केले. त्यानंतर दिया हनीमूनसाठी मालदीवला गेली होती. यादरम्यान दियाने एक ट्विट केले होते.या ट्विटमध्ये तिने पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टवर कमेंट केली होती. या ट्विटमुळे खुप गदारोळ झाला होता.
ट्विटमध्ये काय लिहले होते ?
दिया मिर्झाने (Dia Mirza Birthday) या ट्विटमध्ये एक रिपोर्ट शेअर केला होता. या रिपोर्टमध्ये तिने असे म्हटले होते की, एका शास्त्रज्ञाच्या नवीन संशोधनात असे समोर आले आहे की, प्रदूषणामुळे पुरुषांचे प्रायव्हेट पार्ट आकुंचन पावत आहे, आणि शुक्राणूंची संख्या देखील कमी होत आहे. या रिपोर्टचा हवाला देत दियाने लिहिले की, आता कदाचित जग हवामान संकट आणि वायू प्रदूषणाला थोडे अधिक गांभीर्याने घेईल. मात्र दियाच्या या ट्विटचा जोरदार निषेध करण्यात आला होता. अनेकांना दियाचे हे ट्विट आवडले नव्हते. यामुळे मोठा वाद झाला होता.
प्रेग्नेंसीवरून वाद
दिया मिर्झाने (Dia Mirza) लग्नानंतर लगेचच प्रेग्नेंसीची बातमी शेअर केली होती. 15 फेब्रुवारीला वैभव रेखीशी लग्न केल्यानंतर काही वेळातच दियाने तिच्या गरोदरपणाची बातमी शेअर केली, ज्यानंतर अनेकांनी अभिनेत्रीवर जोरदार टीका केली होती. काहींनी म्हटले की,दियाने आपली गर्भधारणा लपवण्यासाठी लग्न केले आहे. मात्र दियाने यावर कोणतेही स्पष्टीकरण दिले नव्हते.
‘या’ चित्रपटात झळकली
दियाने (Dia Mirza Birthday) 19 ऑक्टोबर 2001 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘रेहना है तेरे दिल में’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.या चित्रपटातील दियाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. यानंतर दीवानापन, तुमको ना भूल पायेंगे, दम, परिणीता, लगे रहो मुन्नाभाई आणि संजू या हिट चित्रपटांमध्ये तिने काम केले. हे तिचे चित्रपट हिट ठरले होते.
दरम्यान इतके हिट चित्रपट करून सुद्धा ती वादांमुळे खुप चर्चेत राहिली होती. सध्या ती चित्रपटापासून दुर आहे. तसेच ती चित्रपटात पुन्हा पुनरागमन करेल अशी देखील कोणतीही बातमी समोर आली नाही आहे.