Fatima Sana Post: मिस्टर खानची नवी नवरी! फातिमानं दिले लग्नाचे संकेत?

Uncategorized

Fatima Sana Shekh bollywood actress share aamir khan wedding post: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री फातिमा सना शेखनं आमिर खानच्या मुलीच्या साखरपुड्याला हजेरी लावली होती. त्यावरुन वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते.

वास्तविक गेल्या काही महिन्यांपासून फातिमा सना शेख आणि आमिर खान यांच्यातील रिलेशनशिपच्या वेगवेगळ्या चर्चा व्हायरल झाल्या होत्या. त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या कमेंट्स लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

फातिमानं सोशल मीडियावर केलेली पोस्ट चाहत्यांच्या कौतूकाचा वर्षाव सुरु केला आहे. यापूर्वीच्या त्यांच्या व्हायरल झालेल्या बातम्यांनी नेटकऱ्यांनी आमिरला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते. आता दंगल गर्लनं शेयर केलेल्या एका पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आमिरच्या मुलीच्या साखरपुड्याच्या दिवशी तिनं बोहेमियन लूक केला होता. ज्याची चर्चा झाली होती. तिच्या व्हाईट कलरच्या टँसेल टॉपनं त्या कार्यक्रमात रंग भरले होते, आता तर वेगळयाच चर्चेला उधाण आले आहे.

हे वाचा:   करिना कपूर तिसऱ्यांदा होणार आई? सोशल मीडियावर बेबी बंपचा फोटो व्हायरल

इंस्टावरुन फातिमानं एक फोटो शेयर केला असून त्यावर एक कॅप्शनही लिहिली आहे. त्यात ती म्हणते, टू डु या नॉट टू डू…. तिच्या या पोस्टवरुन नेटकऱ्यांनी वेगवेगळे तर्क लढवले आहेत. तिच्या या पोस्टवरुन तिला वेगवेगळ्या प्रतिक्रियाही दिल्या आहे.

वास्तविक आमिर आणि फातिमा यांच्यातील नात्याबाबत अधिकृतपणे कोणत्याही प्रकारची माहिती समोर आली नसली तरी चाहते आणि नेटकऱ्यांकडून व्हायरल झालेल्या प्रतिक्रियांनी वेगळ्याच चर्चेला तोंड फुटले आहे.

अशाप्रकारे पोस्ट शेयर करुन फातिमानं लग्नाचे संकेत तर दिले नाही ना, विशेष म्हणजे आमिर खानच्या मुलीनं देखील त्या फोटोवर दिलेल्या प्रतिक्रियेनं चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. रिया चक्रवर्तीनं देखील त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका नेटकऱ्यानं कमेंट करताना लिहिलं आहे की, मिस्टर खानची नवी नवरी….फातिमाची ती नॉटवाली पोस्ट आता भलतीच चर्चेत आली आहे.

हे वाचा:   ‘मुख्य भूमिकेसाठी त्याने माझ्याकडून…’, नयरतारा हिच्याकडून कास्टिंग काउचबद्दल धक्कादायक खुलासा

Leave a Reply