Ravi Jadhav: दिग्दर्शक रवी जाधव वयाच्या 51 व्या वर्षी पुन्हा अडकला लग्नबंधनात? पत्नीनं शेअर केला खास फोटो

Uncategorized

मराठी चित्रपसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव (Ravi Jadhav) त्याच्या चित्रपटांनी नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. मराठीसोबतच  रवी हा हिंदी चित्रपटांचे देखील दिग्दर्शक करत आहे. त्याचा ताली हा हिंदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) प्रमुख भूमिका साकारणार आहे. रवी हा त्याच्या चित्रपटांमुळे तो चर्चेत असतो, पण सध्या तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. रवीची पत्नी मेघना जाधवनं (Meghana Jadhav) एक खास पोस्ट नुकतीच शेअर केली आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. 

   

मेघना जाधवची पोस्ट

रवी जाधवची पत्नी मेघना जाधवनं एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. या फोटोमध्ये रवी आणि मेघना हे वेडिंग लूकमध्ये दिसत आहेत. या दोघांनी पुन्हा लग्नगाठ बांधली आहे का? असा प्रश्न काही नेटकऱ्यांना हा फोटो पाहून पडू शकतो. पण एक खास कारणामुळे मेघनानं हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  आज मेघना जाधव  आणि रवी जाधव यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. यानिमित्तानं हा फोटो मेघनानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोला मेघनानं कॅप्शन दिलं, आमच्या लग्नाचा 24 वा वाढदिवस आहे. आम्ही 1992 मध्ये भेटलो आणि 1998 मध्ये लग्न केले. अनमोल क्षणांनी भरलेला हा प्रवास पुढे असाच चालू राहिल.’ मेघनाच्या या पोस्टला अनेकांनी कमेंट करुन रवी आणि मेघना यांना शुभेच्छा दिल्या. 

हे वाचा:   मिस वर्ल्ड जिंकली तेव्हा अशी दिसायची ऐश्वर्या राय; अभिषेकचा तेव्हाचा फोटो पाहाल तर म्हणाल ...

सेलिब्रिटींनी केल्या पोस्ट

मेघनाच्या पोस्टला अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करुन शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री स्पृहा जोशी, हृता दुर्गुळे यांनी कमेंट करुन मेघना आणि रवी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

रवीचा ताली हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तर त्याच्या टाइमपास, नटरंग, बालक-पालक, कच्चा लिंबू या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच त्याच्या अटल या चित्रपटाची देखील प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.

Leave a Reply