आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही प्रेक्षकांची आवडती मालिका. आता ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. होय, सध्या मालिका एका रंजक वळणावर आली आहे.
कथा पुन्हा एकदा अरुंधती आणि आशुतोष यांच्याभोवती फिरतांना दिसत आहे आणि आता चाहते ज्या क्षणाची वाट पहात होते तो क्षण देखील जवळ आला आहे. होय, कदाचित अरूंधतीनं आशुतोषवरच्या प्रेमाची कबुली दिली आहे. सध्या याचीच चर्चा आहे.अरुंधतीच्या आयुष्यातील संकटांची मालिका संपता संपत नाहीये.
अशात अरूंधतीच्या आयुष्यात आशुतोष येतो. तो तिला नवा आत्मविश्वास देतो, प्रेरणा देतो. अरूंधती व आशुतोष एकत्र यावेत, अशी प्रेक्षकांची भरभरून इच्छा आहे. तर आता चाहत्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. आई कुठे काय करते’ या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे.
अरुंधती व आशुतोष दोघेही एकमेकांना फोन करतात. त्यानंतर अरुंधती आशुतोषला भेटते. ‘मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे.’ असं ती आशुतोषला म्हणते, ते ऐकून आशुतोषचा आनंद गगनात मावेनासा होता. ‘तुला तुझ्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही याची मी तूला खात्री देतो अरुंधती…, असं म्हणतो.
तर दुसरीकडे अरुंधती घरी येताच अनिरूद्ध तिला डिवचतो. मग कधी आहे लग्न? असं तो तिला विचारतो. त्यावर, ‘मी स्वतः सगळं सांगेन तुम्हाला पण वेळ आल्यावर…, असं म्हणत अरूंधती निघून जाते. अरूंधतीच्या उत्तराने अनिरुद्ध चांगलाच बिथरलेला दिसतो.आता हा बिथरलेला अनिरूद्ध अरूंधतीच्या आयुष्यात पुन्हा कोणतं वादळ आणतो, ते बघणं इंटरेस्टिंग असणार आहे.
अनिरुद्धच्या अशा वागण्यामुळे खर तर संजना देखील भडकली आहे. , ‘तू जेवढं तिचा वाईट करायला जातोस तितकंच तिचं भलं होतंय. हरलास अनिरुद्ध परत हरलास’, असं ती त्याला म्हणते. हे ऐकून अनिरुद्धला चांगलाच राग येतो.
अशात अरुंधती दुसऱ्या व्यक्तीसोबत पुन्हा संसार थाटणार ही गोष्ट अनिरुद्धला मान्य होणार का? देशमुखांच्या घरातल्यांसोबतच मालिकेचे प्रेक्षक अरुंधतीच्या या निर्णयाला पाठिंबा देणार का? अरुंधती आणि आशुतोष यांचं लग्न अखेर होणार का? हे पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.