अन् तब्बूने अजय देवणगला जवळ खेचत भर कार्यक्रमात केलं किस, ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Uncategorized

मुंबई: अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री तब्बू यांची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘भोला’ या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित सिनेमाचा टीझर २४ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दरम्यान तब्बू आणि अजय या दोघांची जुनी मैत्री आहे, ट्रेलर लाँच दरम्यानही त्यांनी काही खास क्षण साजरे केले.

दरम्यान सोशल मीडियावर तब्बू आणि अजयचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये तब्बूने अजयच्या गालावर किस केले. या दरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून समोर आले आहेत.

तब्बू आणि अजय यांनी ‘भोला’च्या ट्रेलर लाँचदरम्यान एकत्र एन्ट्री केली. तर सिनेमाची टीमही यावेळी उपस्थित होती. माध्यमांशी संवाद साधताना तब्बू आणि अजय यांनी विविध प्रश्नांची उत्तरं दिली तर ‘भोला’विषयीही भाष्य केले. पॅपाराझींनीही या जोडीचे असंख्य फोटो क्लिक करत सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यामध्येच तब्बूने अजयच्या गालावर किस केल्याच्या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

हे वाचा:   गौरी व जयदीपचा ऑनस्क्रीन रोमान्स पाहून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेवर प्रेक्षकांचा संताप, म्हणाले “आमच्या मुलांवर…”

भोला या सिनेमाचे दिग्दर्शन अजय देवगणचे असून तो दिग्दर्शक म्हणून कसा आहे, याविषयीही तब्बूने माध्यमांशी बोलताना भाष्य केले. त्याच्या दिग्दर्शकीय आणि तांत्रिक कौशल्यांचे तब्बूने कौतुक केले. दरम्यान यावेळी तब्बूला विचारले की तिचे सिनेमाच्या सेटवर तिला पॅम्पर करण्यात आले का.

यावेळी तब्बू गंमतीत असं म्हणते की लाड तर सोडाच अजय माझ्याकडे पाहून हसलाही नाही. असं म्हणून ती त्याच्या गालावर किस करते. दरम्यान भोलाचा टीझर ट्विटरवरही ट्रेंड करत होता. दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक असणाऱ्या ‘भोला’ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

अजय देवगणचा भोला हा सिनेमा साऊथचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘कैथी’चा हिंदी रिमेक आहे. मूळ चित्रपटात सुपरस्टार कार्ती शिवकुमारने मुख्य भूमिका साकारली होती. बॉक्स ऑफिसवर कैथी सिनेमाने तगडी कमाई केलेली. त्यामुळे भोलाकडूनही प्रेक्षकांची अपेक्षा वाढल्या आहेत. दरम्यान अलीकडेच कैथीच्याही सिक्वेलची घोषणाही करण्यात आली असून त्यात दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन मुख्य भूमिकेत दिसतील. भोलाची कथा ड्रग माफियांभोवती फिरते. तर तब्बू यामध्ये डॅशिंग पोलीस ऑफिसरची भूमिका साकारतेय.

Leave a Reply