अभिनेता आमिर खान सोडणार देश? किरण रावचं मोठं वक्तव्य

Uncategorized

Aamir Khan On Leaving Country : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून आमिर खानला ओळखलं जातं. आमिर खान शेवट ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसला होता. जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा लोकांनी या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती.

खरंतर, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आमिर खानची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, ज्यामध्ये तो असहिष्णुतेवर वक्तव्य करताना दिसला होता.

या मुलाखतीत अभिनेता म्हणाला होता की, त्याची पत्नी किरण रावला देशात राहण्याची भीती वाटते. आणि जेव्हा अभिनेता आप की अदालत शोमध्ये आला तेव्हा तो म्हणाला, “मी आणि किरण इथेच जन्मलो आणि इथेच मरणार”.  
 
आमिरने देश सोडण्याबाबत स्पष्टीकरण दिले
शोचा होस्ट रजत शर्मा म्हणाला, “आमिर कयामत से कयामत पासून आजपर्यंत इतके सिनेमा हिट झाले आहेत. एवढं प्रेम लोकांनी तुम्हाला दिलं आहे. एवढी पसंती दिली आणि तुम्ही म्हणताय की पत्नी मुलांसह देश सोडून जाईन.” यावर आमिर खानने उत्तर देत म्हटलं की, “राजत जी हा पूर्णपणे चुकीचा आरोप आहे. सत्य हे आहे की मी याच देशात जन्मलो आणि मी इथेच मरणार आहे.

हे वाचा:   स्मृती इराणींनी स्वत: केले चुरमा लाडू, बघा खास रेसिपी- आणि पौष्टिक चविष्ट लाडू

आणि सत्य हे आहे की, मी या देशाबाहेर दोन आठवडेही जगू शकत नाही.” आमिर पुढे पुढे म्हणाला, ”आम्ही अनेकदा घरी खूप बोलतो, याचा अर्थ असा नाही की आम्ही शंभर टक्के त्यावर एक्शन घेणार आहोत किंवा आमचा असा हेतू आहे.”

 ‘आम्हा दोघांचंही देशावर खूप प्रेम आहे


आमिर पुढे म्हणाला, “किरणने खरं तर एक भावना व्यक्त केली होती. तिने मला एक भावना सांगितली आणि त्या भावनेने मी घाबरलो होतो. जर तुम्ही माझी मुलाखत पाहिली असेल, तर मी म्हणालो होतो की तू जे म्हणत आहेस ते पुर्णपणे चूकीचं आहे.  मला ही गोष्ट अजिबात पटत नाही.पण तरीही ती स्वतःची एक भावना व्यक्त करत होती.

हे वाचा:   ‘सलमान खान ड्रग्ज घेतो, आमिरबद्दल माहिती नाही आणि अभिनेत्री तर...’; बाबा रामदेव यांची बॉलिवूडवर जहरी टीका!

तिलाही कधी देश सोडायचा नाही. ती अगदी स्पष्ट आहे की तिलाही तसंच राहायचं आहे. किरणचा जन्मही इथेच झाला होता, तिचा मृत्यूही इथेच होईल. आणि आम्हा दोघांचंही देशावर खूप प्रेम आहे. आम्ही अजिबात देश सोडणार नाही.”

Leave a Reply