‘आई कुठे काय करते’ मालिका कायमची बंद करा, प्रेक्षकांचा संताप अनावर

Uncategorized

‘आई कुठे काय करते’ ही मराठी मालिका सुरुवातीपासूनच चर्चेत आहे.ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेचा आणि त्यातील कलाकारांचा अफाट मोठा चाहतावर्ग आहे. मालिकेत येणारे ट्विस्ट आणि टर्न्स प्रेक्षकांना आकर्षित करुन घेत असतात.

   

मात्र बऱ्याच वेळा मालिकेची कथा भरकटत चालली किंवा एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला की, प्रेक्षक कंटाळतात आणि त्या मालिकेवर आपला संताप व्यक्त करु लागतात. असंच काहीसं ‘आई कुठे काय करते’ या मालिकेबाबत दिसून येत आहे. या मालिकेवर काही प्रेक्षकांनी आक्षेप घेत संताप व्यक्त केला आहे.

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका अतिशय लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. मालिका टीआरपीच्या शर्यतीत सतत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असते. ही मालिका आई अर्थातच अरुंधती या पात्राभोवती फिरणारी आहे. मालिकेच्या सुरुवातीलाही वेगळा आशय असणारी कथा प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडली होती. त्यामुळे अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय झाली होती. या मालिकेवरुनच हिंदी मालिका ‘अनुपमा’ सुरु करण्यात आली होती. य मालिकेने आपला विशेष चाहतावर्ग निर्माण केला आहे.

हे वाचा:   विनोद खन्नासोबत झोपण्यासाठी माधुरीने घेतले होते कोट्यवधी रुपये, नव्हती राहिली कोणासोबत नजर मिळवण्याच्या लायक, तासनतास गाळायची नुसती

मात्र आता या मालिकेला प्रेक्षक कंटाळले की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मालिकेत सुरु असलेला ट्रॅक काही प्रेक्षकांना रुचत नसल्याचं दिसून येत आहे. एका युजरने कमेंट करत ‘आईच्या नावाने सुरु झालेल्या मालिकेत इतकी प्रेम प्रकरणे दाखवत आहात. आई आजी झाल्यानंतर तिचं लग्न दाखवत आहात. आता ही मालिका तुम्ही बंद करुन टाका’. असा संताप या नेटकऱ्याने व्यक्त केला आहे.

मालिकेत सध्या आशुतोष आणि अरुंधतीच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. आशुतोषने नुकतंच अरुंधतीला लग्नासाठी मागणी घातली होती. यावेळी अरुंधतीने आशूला होकार देत लग्न करण्यास संमती दिली आहे. दरम्यान अरुंधती आता आजीसुद्धा बनली आहे. नुकतंच तिच्या नातीचं बारसंसुद्धा पार पडलं. मालिकेत विविध ट्विस्ट आणि टर्न्स सतत पाहायला मिळत आहेत.

हे वाचा:   पाच वर्षात ‘पुष्पा’ फेम रश्मिका मंदाना हिच्या नावावर इतके आलिशान फ्लॅट्स? आकडा ऐकून व्हाल थक्क

अनघा आणि अभिच्या मुलीचं नाव काय ठेवलं हे ऐकण्याची सर्वांना उत्सुकता होती. या भागात अरुंधती नातीचं नाव सांगणार तोच यश पुतणीच्या नावाचा सुंदर बोर्ड घेऊन येतो. अरुंधती आणि यश दोघे मिळून अनघाच्या बाळाचं नाव सगळ्यांना सांगतात. प्रोमोमध्ये बाळाचं पूर्ण नाव दाखवण्यात आलेलं नाही. पण ‘नकी’ असे दोन शब्द दिसत आहेत. यावरून बाळाचं नाव ‘जानकी’ असं ठेवल्याचं लक्षात येत आहे.

Leave a Reply