काहीही शक्य आहे! ३५ व्या वर्षी अभिनेत्रीचं १० वं लग्न, एक लग्न तर साखरपुड्यानंतर मोडलं

Uncategorized

अभिनेत्री श्रद्धा आर्या ही हिंदी टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेला प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ काही मिनिटांत व्हायरल होत असतो. अनेक वर्षांपासून ती ‘कुंडली भाग्य’ या प्रसिद्ध टीव्ही मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. तिचा अभिनय आणि निरागसता लोकांना प्रचंड आवडते. गेल्या वर्षी श्रद्धाने राहुल नागलशी लग्न केलं.

   

दरम्यान, श्रद्धा आर्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज अनेक मजेदार फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करते. चाहत्यांना तिची प्रत्येक पोस्ट आवडते. पण आता अभिनेत्रीने असा एक फोटो शेअर केला जो पाहून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे.

१० व्यांदा केलं लग्न

अभिनेत्रीने काही फोटो शेअर करत हे तिचं १० वं लग्न असल्याचं सांगितलं. अभिनेत्रीने तिचा नववधूचा लूक इन्स्टाग्रामवर शेअर केला. पण या फोटोंमध्ये ती पती राहुल नागलसोबत नाही तर अन्य कुणासोबत दिसत आहे. ती नववधू झाली तर शक्ती अरोरा तिचा नवरा झाला आहे.

हे वाचा:   आलिशान घर अन् गाड्या; लतादीदी मागे सोडून गेल्या 'इतकी' संपत्ती; आता कोण आहे वारसदार?

त्याच शोमध्ये १० वे लग्न

त्याचं झालं असं की आर्याने हे फोटो कुंडली भाग्य मालिकेच्या सेटवरून शेअर केले. स्क्रिप्टच्या मागणीनुसार तिचं आणि शक्तीचं लग्न होणार आहे. विशेष म्हणजे शोमधील फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, त्याच मालिकेतलं हे तिचं १० वं लग्न आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांनीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अभिनेत्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर २०१५ मध्ये ती एनआरआय उद्योगपती जयंत रत्तीसोबत लग्न करणार होती. मीडिया रिपोर्टनुसार, लग्नापूर्वी जयंतने श्रद्धासमोर एक अट ठेवली होती की, तिला अभिनय सोडावा लागेल. मात्र, अभिनेत्री यासाठी तयार नव्हती. याच कारणामुळे त्यांचा साखरपुडा मोडला. श्रद्धाने नंतर २०२१ मध्ये नौदल अधिकारी राहुल नागलशी लग्न केले.

Leave a Reply