चाळीत राहणाऱ्या भाऊ कदमचं डोंबिवलीतील आलिशान घर पाहिलं का?

Uncategorized

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय विनोदी कलाकार भालचंद्र कदम म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका भाऊ. आपल्या उत्तम टायमिंगने आणि प्रचंड मेहनतीने भाऊ कदमने अनेकांची मने जिंकली आहेत. ‘चला हवा येऊ द्या’नंतर भाऊ कदम चर्चेत आला.

भाऊ कदमची मोठी मुलगी मृण्मयी कदम ही यूट्यूबर आहे. ती अनेकदा लाईफस्टाईल, फॅशन, मेकअपवर व्हिडीओ, व्लॉग करत असते. तिच्या व्हिडीओतून अनेकदा भाऊ कदमचं आलिशान घर त्याचं इंटिरिअर दिसत असतं. तसेच मृण्मयी कदमने वाढदिवसादिवशी व्लॉग तयार केला. ज्यामध्ये तिने संपूर्ण घराची सफर घडवली आहे.

लिव्हिंग एरिया

भाऊ कदमच्या घराची पहिली ओळख होते ती लिव्हिंग रूमने ज्याला आपण सामान्यपणे हॉल म्हणतात. फ्रेंच व्हिडीओच्या समोर सोफा असल्यामुळे तुम्ही निसर्गाचा किंवा बाहेरचा आस्वाद घेऊ शकता. हे या फोटोतून खूप छान दिसतंय.चाळीत राहणाऱ्या भाऊच्या या घराची ओळख खूप खास आहे.

हे वाचा:   बॉलीवूड स्टार्स प्रायव्हेट जेट: हे स्टार्स आहेत प्रायव्हेट जेटचे मालक, गुपचूप करतात परदेशवारी

उत्तम रंगसंगती

भाऊ कदमच्या घरामध्ये उत्तम रंगसंगती पाहायला मिळते. घरात सर्वाधिक सफेद रंगाचा वापर आहे. सफेद रंग असल्यामुळे कोणत्याही रंगाच इंटिरिअर शोभून दिसतं. तसेच या घरात रंगसंगतीचा खूप छान विचार केला आहे. अगदी हिरवा, पिवळा रंग, गुलाबी रंग देखील पाहायला मिळतो.

पडदे घराला साजेसे

भाऊ कदमच्या घराचा रंग हा सफेद असल्यामुळे याला कोणत्याही रंगाचे पडदे सुंदर दिसतील. पण भाऊने याकरता ब्राऊन रंगांच्या पडद्यांची निवड केली आहे.

उत्तम इंटिरिअर

भाऊ कदमच्या घरात उत्तम इंटिरिअर करण्यात आलं आहे. यामध्ये वेगवेगळे रकाने तयार केले आहेत. ज्यामध्ये सुंदर फोटो फ्रेम किंवा मूर्ती ठेवल्या आहेत. यामुळे घराला एक वेगळीच झलक आली आहे. एक संपूर्ण भिंत या फोटो फ्रेमने भरलेली आहे. जे अतिशय उत्तम दिसतं.

हे वाचा:   परदेशात शूटिंग करताना नाकातून झाला रक्तस्त्राव अन्… सेटवरच प्रसिद्ध अभिनेत्रीची प्रकृती ढासळली, रुग्णालयात दाखल

घरात केलाय प्रत्येकाचा विचार

भाऊ कदमच्या घरी प्रत्येकाचा विचार केला आहे. कदम कुटुंबीय हे ज्येष्ठांपासून के अगदी चिमुकल्यांपर्यंत साऱ्यांनी भरलेलं आहे. भाऊ कदमच्या आईची एक खोली आहे आणि मुलांची खोली आहे. या सगळ्याचा विचार करताना तेथील आरामदायी गोष्टी आणि रंगसंगती असा विचार केला आहे.

भाऊच्या घरी आकर्षक मूर्ती

भाऊ कदमच्या घरी गौतम बुद्धांची एक आकर्षक मूर्ती आहे. घराच्या लिविंग एरियामध्ये बुद्धांची आकर्षक मूर्ती आहे. संपूर्ण काळ्या रंगाची मनमोहक मूर्ती लक्ष वेधते.

भाऊ कदमच्या घराची झलक

Leave a Reply