तुम्हीही आवडीने चहासोबत खाता टोस्ट? मग एकदा हा VIDEO पाहाच, खाण्याआधी कराल विचार

Uncategorized

सकाळी चहासोबत ब्रेड किंवा टोस्ट खाण्यात एक वेगळाच आनंद असतो. रिकाम्या पोटी चहा पिणे योग्य नाही, म्हणून ब्रेड आणि टोस्ट हा देखील सकाळचा सर्वोत्तम नाश्ता आहे, जो लवकर तयार होतो. असे बरेच लोक आहेत ज्यांना टोस्ट इतके आवडतात की ते दररोज सकाळी चहासोबत टोस्टच खातात. पण तुमचा आवडता टोस्ट कसा बनवला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? टोस्ट बनवतानाचा फॅक्टरीमधील व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही थक्क व्हाल.

   

Instagram वर gamerkebaap नावाच्या अकाऊंटवरुन शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये टोस्ट बनवताना पाहून तुम्ही थक्क व्हाल. लहानपणापासून आपल्याला घाबरवण्यासाठी किंवा बाहेरचे पदार्थ खाऊ नये म्हणून जे सांगितलं जायचं, ते खरं होताना या व्हिडिओमध्ये दिसतं. यात टोस्ट बनवण्यासाठी तयार केलेलं पीठ मळताना एक कामगार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र पकडला गेल्यानंतर त्याने आपली चूक मान्य केलेली नाही. व्हिडिओला 1 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

हे वाचा:   “दादा गुटखा खातात…” कथित बॉयफ्रेंडचा फोटो शेअर केल्याने सई ताम्हणकर ट्रोल

टोस्ट बनवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हे दृश्य एका व्यक्तीने गुपचूप आपल्या कॅमेऱ्यात कैद केले, त्यानंतर मोठा खुलासा झाला. एक व्यक्ती यात पायाने टोस्टचं पीठ मळताना दिसत आहे. कदाचित या पीठाला मळण्यासाठी जास्त शक्ती हवी होती, म्हणून हातांऐवजी ते पायाने मळणे त्याला योग्य वाटले.

फॅक्टरीमध्ये त्याच्याशिवाय इतर कोणीही नव्हतं. याचाच पुरेपूर फायदा घेत या व्यक्तीने हाताने केल्या जाणाऱ्या कामासाठी आपल्या पायांचा वापर केला. हा व्हिडिओ एका व्यक्तीने लपून कॅमेऱ्यात कैद केला. ही बाब तरुणाच्या लक्षात येताच, तो हात जोडून माफी मागू लागला. व्हिडिओ रेकॉर्ड करणारा व्यक्ती या वर्करच्या समोर जाऊन त्याच्या मालकाचा नंबर मागताना दिसला. जेणेकरून मालकाला ही बाब सांगता येईल.

हे वाचा:   ‘दिलीप जोशी’च्या घराबाहेर 25 जण शस्त्रांसह उभे?, अलर्ट जारी, पोलिसांना आला कॉल

हे ऐकून वर्कर घाबरला आणि कारणं सांगू लागला. हैराण करणारी बाब म्हणजे नंतर तर त्याने हे खोटं असून आपण हातानेच हे काम करत होतो, असं सांगण्यास सुरुवात केली. मात्र सत्य कॅमेऱ्यात कैद झालं होतं. हा व्हिडिओ अतिशय धक्कादायक आहे. त्यामुळे बाहेरचे अन्नपदार्थ खाण्याआधी ते कशाप्रकारे बनवले गेले आहेत, याची माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे.

Leave a Reply