“दादा गुटखा खातात…” कथित बॉयफ्रेंडचा फोटो शेअर केल्याने सई ताम्हणकर ट्रोल

Uncategorized

मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. सई ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सईने मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारत अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. सध्या सई ही आघाडीच्या नायिकांपैकी एक आहे.

   

सई ताम्हणकरने नुकताच तिच्या कथित बॉयफ्रेंड निर्माता अनिश जोगबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. मात्र त्यामुळे ती ट्रोल झाली आहे.

सई ताम्हणकर ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत सई ही अनिशबरोबर बसल्याचे दिसत आहे. त्यात सई आणि अनिश बाजूबाजूला बसले आहेत. त्या दोघांनीही शॉर्ट्स परिधान केली आहे. तर त्या दोघांनीही सनग्लासेस घातले आहेत. या फोटोत ते दोघेही आनंदी असल्याचे दिसत आहे.

हे वाचा:   Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा किसिंग सीन व्हायरल, ‘प्रेम प्रथा धुमशान’मधील बोल्ड अंदाज चर्चेत

सईने हा फोटो शेअर करताना सिरीअल चिलर्स असे म्हटले आहे. त्यावरुन अनेक नेटकऱ्यांनी तिला आणि अनिशला ट्रोल केले आहे. यावर एक नेटकऱ्याने ‘दादा गुटखा खातात वाटत’ असे म्हटले आहे. ‘तंबाखू खातं का काय हे’, असा प्रश्न एकाने विचारला आहे. तर एकाने ‘चांगल्या मुलींना विमलवाले आवडतात’, असे म्हटले आहे.

‘हे पाहण्यापूर्वी मी आंधळा का झालो नाही’, अशी कमेंट एकाने केली आहे. तर एकाने ‘ये गुटखा खाणाऱ्या…’ असे म्हटले आहे.

दरम्यान सई ताम्हणकर आणि अनिश जोग एकमेकांना अनेक दिवसांपासून ओळखतात. त्या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. ‘गर्लफ्रेंड’, ‘धुरळा’, YZ, ‘टाइम प्लीज’ अशा अनेक चित्रपटांचा अनिश निर्माता आहे.

Leave a Reply