‘दीड वर्षापूर्वी माझ्या गालावर अचानक..’,मधुराणीनं केला चेहऱ्यावरील जखमेचा मोठा खुलासा

Uncategorized

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील ‘अरुंधती’ या व्यक्तिरेखेमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सोशल मीडियावरही सक्रिय असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात आणि अनेकदा रोजच्या आयुष्यातील घडामोडी त्या चाहत्यांशी याच माध्यमातून शेअर करताना दिसतात. काही काळापासून मधुराणी म्हणजेच ‘आई कुठे काय करते’मधील अरुंधतीच्या गालावर एक छोटीशी काहीतरी जखमेची खूण दिसत आहे. याचीच माहिती त्यांनी एक पोस्ट शेअर करत दिली आहे. जी खूप व्हायरल होताना दिसत आहे.

   

मधुराणी प्रभुलकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर वर्षाच्या अखेरच्या दिवशी एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्या उजव्या गालावर असलेल्या जखमेमागची कहाणी सांगितली आहे. त्याचबरोबर त्यांनी या व्हिडीओतून चाहत्यांना एक सकारात्मक संदेशही दिला आहे. मधुराणी यांचा हा व्हिडीओ सध्या बराच चर्चेत आहे.

मधुराणी प्रभुलकर यांनी हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, “मी आज माझ्या गालावरच्या जखमेविषयी बोलणार आहे. गेल्या वर्षात तिनी मला खूप शिकवलंय. स्वतः कडे आणि आयुष्याकडे बघायचा वेगळा दृष्टीकोण दिलाय. कदाचित तुम्हालाही ह्यातून काही हाती लागलं तर नक्की सांगा. नवीन वर्षाच्या खूप खूप खूप शुभेच्छा…!!!!”

हे वाचा:   Viral : तिरडी बांधली अन् मयत व्यक्ती सिगारेट ओढू लागला; Video पाहून थरकाप उडेल

या व्हिडीओमध्ये त्या म्हणातायत, “दीड वर्षांपूर्वी माझ्या गालावर एक उंचवटा दिसायला लागला आणि नंतर मला या जखमेबद्दल कळलं. माझं ऑपरेशन झालं. जून, जुलैच्या दरम्यान मी काही एपिसोड बॅन्डेज लावून केले. मला या जखमेचे आभार मानायचे आहेत कारण या जखमेने मला खूप शिकवलं. मी जेव्हा बॅन्डेज लावून शूट करत होते तेव्हा मालिकेचा क्लायमॅक्स होता पण तरीही प्रेक्षकांनी माझ्यावर भरभरून प्रेम केलं, मला या जखमेसहीत स्वीकारलं. तेव्हा या जखमेनंही मला स्वतःला जसं आहोत तसं स्वीकारायला शिकवलं.”

मधुराणी पुढे म्हणाल्या, “ऑपरेशननंतर ती जखम भरून निघायला खूप वेळ लागला. या काळात माझ्या मेकअप आर्टिस्टनी माझी खूप काळजी घेतली. ती हळूहळू बरी झाली आणि तिच्या जागी छान खळी तयार झाली. पण पुन्हा एकदा वर्षभरातून आतून एक उंचवटा जाणावायला लागला आणि बाहेरच्या बाजूने काही डिस्चार्ज बाहेर यायला लागला. तेव्हा मात्र माझी अवस्था खूप वाईट झाली. पुन्हा एकदा सर्जरी करावी लागली. यावेळी लेझर सर्जरी झाली.

हे वाचा:   विनोद खन्नासोबत झोपण्यासाठी माधुरीने घेतले होते कोट्यवधी रुपये, नव्हती राहिली कोणासोबत नजर मिळवण्याच्या लायक, तासनतास गाळायची नुसती

मला माहीत आहे की मेकअपशिवाय मी खूप विचित्र दिसते. मला त्यावेळी मेकअपशिवाय कॅमेऱ्यासमोर यायला भीतीही वाटायची. पण जेव्हा मी माझ्या मेंटॉरशी बोलले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, जोपर्यंत तू आतून मनातून ठीक होत नाहीस तोपर्यंत ही बाहेरची जखमही ठीक होणार नाही. आतून ठीक झालीस तर ही जखम आपोआप ठीक होईल. आत काही आहे का? कुणाला दुखावलं आहे का? कुणाला माफ करायचं राहून गेलंय का? तर या सगळ्याचा विचार करता मला वाटतं वर्षाअखेरस हे सर्व सोडून देऊयात, माफ करून टाकूयात.”

Leave a Reply