बच्चन कुटुंबाला धक्का; प्रसिद्ध डायरेक्टरचा Aishwarya Rai वर गंभीर आरोप!

Uncategorized

बॉलिवूड चित्रपट निर्माता साजिद खान हा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. साजिदवर अनेक महिलांनी #MeToo चे आरोप केले होते. या वेळी अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत साजिदची कशी वागणूक होती हे सांगितले. शिवाय त्यानं कशा प्रकारे त्यांच्यासोबत गैरवर्तन केलं हे त्या महिलांनी सांगितले. साजिद खरंतर वादग्रस्त विधानं करण्यासाठी ओळखला जातो. एकदा तर त्यानं बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या रायविषयी वादग्रस्त विधान केलं होतं.

   

साजिदनं बॉलिवूड दिग्दर्शक शो कॉफी विथ करणमध्ये हजेरी लावली होती. यावेळी करणनं साजिदला विचारले की तो बेस्ट प्लास्टिक सर्जरी पुरस्कार कोणाला देईल? त्यावर उत्तर देत साजिदनं ऐश्वर्या रायचे नाव घेतले होते. साजिद म्हणाला की, ‘मला ऐश्वर्या रायला तिच्या प्लॅस्टिक स्माईलसाठी ‘बेस्ट प्लास्टिक सर्जरी अवॉर्ड’ द्यायचा आहे.’ मात्र, केवळ ऐश्वर्याच नाही तर त्यानं स्वत: ची बहीण फराह खानवर देखील असेच वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

हे वाचा:   कॅमेरासमोरच घसरला काजोलचा पदर, प्रायव्हेट भाग दिसताच झाली ऊप्स मोमेंट्सी शिकार….

करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये शोमध्ये हजेरी लावणाऱ्यांसोबत रॅपिड फायर राऊंड खेळतो. याचवेळी ऐश्वर्याला बेस्ट प्लास्टिक सर्जरी अवॉर्ड देईन असे सांगितले. याशिवाय करणनं साजिदला प्रश्न विचारला की फराह खानचा कॉम्युटर हॅक केला तर त्याला काय मिळेल? यावर उत्तर देत साजिद म्हणाला ‘खूप तृतियपंथी भेटतील.’

करणच्या याच शोमध्ये साजिदनं पुढे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची खिल्ली उडवली होती. संजय लीला भन्साळी यांची खिल्ली उडवत साजिद म्हणाला, ‘तो ओव्हररेटेड दिग्दर्शकांपैकी एक आहे.’ यावेळी साजिदनं बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची देखील खिल्ली उडवली. पुढे सलमानचा कॉम्युटर हॅक झाला तर त्यात काय मिळेल असा प्रश्न विचारता साजिद म्हणाला,’ बहुतेक महिला असतील.’

दरम्यान, या नंतर साजिदचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओत त्यानं गौहर खानशी साखरपूडा झाल्याचे कबूल केले आणि सांगितले की अनेक लिंकअप असूनही त्यानं कधीही लग्न केले नाही. तो म्हणाला की, गौहरसोबत त्याचा साखरपुडा झाला असूनही तो अनेक मुलींना ‘आय लव्ह यू’ म्हणत असे, त्यांच्यासोबत हँग आउट करत असे. प्रत्येक मुलीला लग्नाचा प्रस्ताव द्यायचा आणि अनेक मुलीही सीरिअस झाल्या आणि या अर्थाने तर मी 350 लग्न करायला हवी होती.’

हे वाचा:   लाखात एक बुद्धिमान माणुस या फोटोत किती हत्ती आहेत हे सांगू शकतो, फोटो ZOOM करा आणी उत्तर द्या

साजिदचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आलं. इंडस्ट्रीतील 9 महिलांनी त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. या सर्वांनी चित्रपट निर्मात्यासोबत वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम केले आहे. स्वत:वरील आरोपांनंतर साजिदने ‘हाऊसफुल 4’चा दिग्दर्शक म्हणून या चित्रपटापासून दुरावले होते.

Leave a Reply