बिग बींच्या घरात ही अभिनेत्री आहे भाडेकरु, सामान्य माणूस घरासाठी जितकं लोन काढतो तितकं एका महिन्याचं भाडं

Uncategorized

बॉलीवूडचे (Bollywood) शहंशाह आणि महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक ब्लॉकबस्टर (Block Buster Movie) सिनेमे दिले आहेत. कधी काळी 500 रुपये पगारावर काम करणारे अमिताभ बच्चन आज करोडो रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. बॉलिवूडमधल्या सर्वात श्रीमंत कलाकारांमध्ये बीग बी अमिताभ बच्चन यांच्या नावाचा समावेश होतो. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अमिताभ बच्चन यांनी चित्रपटसृष्टीत वेगळं स्थान निर्माण केलं आहे. अमिताभ बच्चन यांची लाईफस्टाईलही लक्झरी (luxury lifestyle) आहे.

कोट्यवधी रुपयांची कमाई

अमिताभ बच्चन यांची नेटवर्थ जवळपास 410 मिलिअन डॉलर म्हणजे भारतीय रुपयात जवळपास 3396 करोड रुपये इतकी आहे. अमिताभ यांची महिन्याची कमाई 5 कोटी तर वर्षाची कमाई 60 कोटी इतकी आहे. याशिवाय त्यांच्या अनेक प्रॉपर्टी भाडेतत्वावर दिल्या असून त्यातूनही करोडो रुपयांची कमाई होते.

ही अभिनेत्री आहे भाडेकरु

अमिताभ बच्चन यांचे मुंबईत चार बंगले आणि काही प्लॅट आहेत. यातील एका प्लॅटमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कृति सेनन (Kriti Sanon) भाडेकरु म्हणून राहते. अमिताभ बच्चन यांचा अंधेरीताल डुप्लेक्स फ्लॅट रेंटवर घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या घरासाठी कृती सेनेनने 2 वर्षांचा भाडे करार केला आहे. या घराचं डीपॉझिटचं लाखो रुपयांमध्ये आहे. तर महिन्यालाही मोठी रक्कम ती रेंट म्हणून देते. 2020 मध्ये अमिताभ बच्चन यांनी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी विकत घेतली होती.

हे वाचा:   “…म्हणून मी गेली अनेक वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर राहिले”; मलायका अरोराने सांगितलं खर कारण

मीडिया रिपोर्टनुसार हा ड्युप्लेक्स लक्झरी फ्लॅट असून अमिताभ बच्चन यांनी तो तब्बल 31 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. मुंबईतल्या अंधेरी इथं हा प्लॅट आहे. या फ्लॅटमध्ये अभिनेत्री कृती सेनन राहते आणि दर महिन्याला रेंट म्हणून ती तब्बल 10 लाख रुपये अमिताभ बच्चन यांना देते. डिपॉझिट म्हणून कृती सेननने 60 लाख रुपये भरले आहेत. दोन वर्षांसाठी हा फ्लॅट तिने भाडे तत्वावर घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी आपली जुहू इथली प्रॉपर्टी स्टेट बँक ऑफ इंडियाला रेंटवर दिली होती. बँकेने यासाठी 12 महिन्यांची आगाऊ रक्क दिली होती, जी करोडोमध्ये होती. या गोष्टीची चांगलीच चर्चा झाली होती. 

अमिताभ बच्चन यांचे मुंबईत चार बंगले


अमिताभ बच्चन यांचे मुंबईच चार बंगले आहेत. जलसा, जनक, प्रतीक्षा आणि वत्स अशी या बंगल्यांची नावं आहेत. अमिताभ आपल्या कुटुंबासह मुंबईतल्या जुहू इथं असलेल्या जलसा बंगल्यात राहतात. या बंगल्याची किंमत जवळपास 100 कोटी रुपये इतकी आहे.

तर त्यांच्या प्रतीक्षा या बंगल्याची किंमत अंदाजे 160 कोटी इतकी आहे. जनक बंगल्यात अमिताभ बच्चन यांचं कार्यालय आहे. याशिवाय उत्तर प्रदेशमध्येही त्यांचं घर आहे. ही प्रॉपर्टी अमिताभ यांनी शैक्षणिक ट्रस्टमध्ये बदलली आहे. एका माहितीनुसार अमिताभ बच्चन यांची फ्रान्समध्येही प्रॉपर्टी आहे.

Leave a Reply