“मी गरोदर असताना गे व्यक्तीबरोबर…” नीना गुप्तांनी सांगितला ‘तो’ धक्कादायक प्रसंग

Uncategorized

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. गेली अनेकवर्ष त्या सातत्याने वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करत आहेत. नुकतंच त्यांच्या मुलीचे मसाबाचे लग्न झाले आहे.

या लग्नाला त्यांचा एक्स बॉयफ्रेंड वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्सदेखील उपस्थित होता. विवियनबद्दल त्या कायमच भाष्य करत असतात. तसेच त्यांनी आपल्या पुस्तकात मसाबाच्या जन्मादरम्यान घडलेले प्रसंग आपल्या पुस्तकात लिहले आहेत.

नीना गुप्ता बॉलिवूड बेधडक अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात आणि त्या नेहमीच आपलं मत बिनधास्तपणे मांडताना दिसतात. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात एक धक्कादायक प्रसंग लिहला आहे. ‘सच कहू तो असं’ त्या आत्मचरित्राचे नाव असून त्यांनी तो प्रसंग सांगितला आहे.

नीना यांच्या मित्राने त्यांना एक गे व्यक्तीशी लग्न करण्याचा सल्ला दिला होता. सामाजिक दबाव टाळण्यासाठी त्या व्यक्तीला लग्न करायचे आहे. मात्र ती व्यक्ती त्यांचा आणि त्यांच्या मुलीचा स्वीकार करण्यास तयार नव्हती.

दरम्यान नीना गुप्ता आणि विवियन रिचर्ड्स १९८० च्या दशकात रिलेशनशिपमध्ये होते. विवियान यांच्यापासून नीना गुप्ता यांना एक मुलगी देखील आहे. विवियन यांनी नीना गुप्ता यांच्याशी लग्न केलं नाही मात्र १९८९ मध्ये नीना यांनी मसाबाला जन्म दिला.

हे वाचा:   “आमचं मिशन पूर्ण झालं”; भगव्या बिकिनीवरील वादादरम्यान ‘पठाण’चे दिग्दर्शक असं का म्हणाले?

त्या नेहमीच विवियन रिचर्ड्स यांच्या संपर्कात होत्या. त्यावेळी विवियन यांचं लग्न झालं होतं त्यामुळे त्याने नीना यांच्यासाठी पत्नीला सोडण्यास नकार दिला होता. यानंतर नीना यांनी मसाबाला एकट्यानेच लहानाचं मोठं केलं. २००८ मध्ये नीना यांनी विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं.

नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा फॅशन डिझायनर आहे. तिने भिनेता सत्यदीप मिश्राशी लग्नगाठ बांधली. सत्यदीप व मसाबा दोघांचंही हे दुसरं लग्न आहे. त्यांनी कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्न केलं. या लग्नातील फोटो व्हायरल होत आहेत.

Leave a Reply