या प्रसिद्ध अभिनेत्याने चालू कॅमेऱ्यासमोरच रेखा यांना केलं होतं जबरदस्ती किस; धक्कादायक होतं कारण

Uncategorized

बॉलिवूडची चिरतरुण अभिनेत्री म्हणून रेखा यांना ओळखलं जातं. रेखा यांनी आपल्या सदाबहार तारुण्याने आपला काळ गाजवला आहे. सुरुवातीपासूनच त्या आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच आपल्या खाजगी आयुष्यमुळेही चर्चेत राहिल्या आहेत. रेखा यांचे सेटवरील किस्से आणि त्यांची प्रेमप्रकरणे आजही तितक्याच उत्सुकतेने ऐकली आणि वाचली जातात.

   

रेखा या नेहमीच एक गूढ, रहस्यमयी अभिनेत्री राहिल्या आहेत. त्यांच्याबाबतची अनेक रहस्ये वेळोवेळी समोर येत असतात. या वयात रेखा आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करतात. त्यांचं सौंदर्य आजही तसूभरदेखील कमी झालेलं नाहीय. रेखा यांना करिअरच्या सुरुवातीच्या काळातदेखील काही वादविवादांना सामोरं जावं लागलं होतं. आज आपण त्याबाबतच जाणून घेणार आहोत.

चेन्नईमध्ये जन्मलेल्या रेखा या साऊथ इंडस्ट्रीमधील त्याकाळच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री पुष्पवल्ली आणि अभिनेता जेमिनी गणेशन यांची लेक आहे. रेखाचे वडील जेमिनी गणेशन आणि आई पुष्पवल्ली यांची भेट एका चित्रपटाच्या सेटवर झाली होती. यामध्ये त्यांनी मुख्य भूमिका साकारली होती. याकाळातच ते एकमेकांच्या अतिशय जवळ आले होते.

हे वाचा:   रश्मिका पाठोपाठ साई पल्लवी करणार बॉलिवूडमध्ये एंट्री; 'या' भूमिकेतून जिंकणार प्रेक्षकांचं मन

परंतु जेमिनी यांनी कधीही रेखाच्या आईसोबत लग्न केलं नव्हतं. आणि लग्न न करताच रेखा यांचा जन्म झाला होता. जेमिनी यांनी कधीही पुष्पवल्ली यांना पत्नीचा दर्जा दिलेला नव्हता. त्यामुळेच रेखा आपल्या नावापुढे वडिलांचं आडनाव लावत नाहीत.

वडिलांपासून विभक्त असल्याने रेखा आणि त्यांच्या आईला अनेक आर्थिक संकंटांना सामोरं जावं लागलं होतं. त्याकाळात रेखा यांच्या आईवर कर्जाचं डोंगर होतं. परिस्थितीची जाणीव ठेऊनच नाईलाजाने रेखा यांना वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी सिनेसृष्टीत पाऊल ठेवावं लागलं होतं.

बालकलाकार आणि अभिनेत्री म्हणून काही तामिळ चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा बॉलिवूडकडे वळवला होता. ‘सावन भादो’ या हिंदी चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. परंतु काही काळातच आपल्या ‘अनजाना सफर’ या चित्रपटामुळे त्यांना वादविवादाचा सामना करावा लागला होता.

रेखा यांच्यावर आधारित ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात लेखक यासिर उस्मान यांनी लिहलंय, ‘अनजाना सफर’ या चित्रपटात रेखा यांना अभिनेता विश्वजित चॅटर्जी यांनी जबरदस्तीने किस केलं होतं. याबाबत दिग्दर्शकाने रेखा यांना कोणतीही पूर्व कल्पना दिलेली नव्हती. दिग्दर्शकाने ऍक्शन म्हटल्यानंतर अभिनेता विश्वजित यांनी रेखाला मिठीत घेऊन जबरदस्ती किस करायला सुरुवात केली होती.

हे वाचा:   काजोलचं बॉलिवूडबाबत धक्कादायक विधान म्हणाली, `काम मिळवण्यासाठी 24 इंच कंबर आणि 36 इंच...`

तब्बल 5 मिनिटे हा प्रकार सुरु होता.मात्र सेटवरील उपस्थित लोकांनी विश्वजित यांना प्रोत्साहन देत चीअरप केलं होतं. या सर्व अचानक घडलेल्या प्रकाराने रेखा मात्र हादरून गेल्या होत्या. त्यांना या सीन नंतर अक्षरशः रडू कोसळलं होतं.

रेखा सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहेत. परंतु त्या आजही चर्चेत असतात. बऱ्याचवेळा रेखा पुरस्कार सोहळ्यांमध्ये आणि रिऍलिटी शोजमध्ये हजेरी लावतात. रेखा यांच्या आयुष्यात अनेक पुरुष आले मात्र दुर्दैवाने आजही त्या एकट्या आयुष्य जगत आहेत. मात्र त्यांचं सौंदर्य, निखळ हास्य आजही नवख्या अभिनेत्रींना लाजवेल असंच आहे. आजही त्या आपल्या ग्लॅमरस लुकने भल्याभल्यांना अवाक करतात.

Leave a Reply