राजेश खन्ना यांना संपवायचं होतं या कारणामुळे जीवन; मोठं कारण समोर

Uncategorized

बॉलिवूड अभिनेता राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांना आजही चित्रपटसृष्टीचे पहिले सुपरस्टार म्हणून लोक ओळखतात. राजेश खन्ना यांच्या चाहत्यांच्या यादीत सगळ्यात जास्त संख्या ही महिलांची होती. त्यांच्या प्रेमात मुली वेड्या होत्या. दरम्यान, असे देखील म्हटले जाते की 1970 मध्ये राजेश खन्ना यांच्या बंगल्यावर इतक्या मुलींची पत्रे यायची की ती वाचण्यासाठी वेगळा माणूस ठेवावा लागायचा. धक्कादायक म्हणजे, यातली काही पत्र ही रक्तानं लिहिलेली होती.

मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, एक काळ असा होता जेव्हा राजेश खन्ना हे नैराश्यात गेले होते. आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत. जेव्हा राजेश खन्ना हे त्यांच्या करिअरच्या उतरणीवर होते, त्या काळात राजेश खन्ना हे नैराश्येत गेले होते. त्यामुळे त्याचा सगळ्यात जास्त परिणाम हा डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) आणि राजेश खन्ना यांच्या नात्यावर झाला होता.

हे वाचा:   “तो कोणाच्या बापालाही घाबरणारा नाही” बायकोने प्रवीण तरडेंचं केलं कौतुक

राजेश खन्ना जेव्हा त्यांच्या करिअरच्या उतारावार होते तेव्हा त्यांना स्वतःला सगळ्यांपासून दूर करून घेतले होते. यावेळी राजेश खन्ना यांनी डिंपल यांना मनातील गोष्टी सांगितल्या नाहीत. यामुळे त्यांच्या रिलेशनशिपबद्दल मीडियामध्ये अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. इतकंच काय तर राजेश खन्ना यांनी डिंपलला एकदा मारहाण देखील केली होती, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता.

मात्र, या सगळ्याचा परिणाम हा असा झाला की राजेश खन्ना आणि डिंपल कपाडीया यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. त्यानंतर डिंपल कपाडीया यांनी राजेश खन्ना यांचे घरही सोडले. इतकंच काय तर राजेश खन्ना हे इतके नैराश्येत गेले होते की त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, असे एका रिपोर्टमध्ये म्हटले होते. दरम्यान, 2012 साली राजेश खन्ना यांचा कर्करोगाशी लढताना मृत्यू झाला होता.

हे वाचा:   अखेर तारीख आणि ठिकाण ठरले,याच महिन्यात या दिवशी सिद्धार्थ आणि कियारा घेणार सात फेरे

दरम्यान, एक काळ असा होता जेव्हा राजेश खन्ना आणि अभिनेत्री अंजू महेंद्रू ( Rajesh Khanna and Anju Mahendru Affair) यांच्या नात्याची प्रचंड चर्चा सुरु होती. पण काही कारणांमुळे दोघांचे लग्न होऊ शकलं नाही. यामुळे लग्न झाल्यानंतर राजेश खन्ना यांनी त्यांची गाडी अंजू महेंद्रू यांच्या घरासमोरून नेली जेणेकरून अभिनेत्रीला राग येईल. 

राजेश खन्ना आणि अंजू महेंद्र यांची पहिली भेट ही 1966 साली झाली होती. त्यावेळी राजेश खन्ना ही प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक होते. तेव्हा पहिल्याच नजरेत राजेश खन्ना आणि अंजू यांनी एकमेकांना पसंत केलं. तर त्या काळात अंजू या करिअरच्या सुरुवातीच्या स्ट्रगलिंगच्या दिवसात होत्या आणि यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करत होत्या. 

Leave a Reply