42 वर्षीय शिक्षकाचं 20 वर्षाच्या विद्यार्थीनीवर जडलं प्रेम; शेवटी दोघांनी घेतला असा निर्णय की सगळे थक्क

Uncategorized

: प्रेम आंधळं असतं ही म्हण तुम्ही अनेकदा वाचली आणि ऐकली असेल, पण काळाच्या ओघात आजकालच्या तरुणाईने प्रेमाची व्याख्याच बदलून टाकली आहे. म्हणूनच प्रेमाच्या अनोख्या कहाण्या समोर येत राहतात. यातील काही घटना अशा असतात ज्या ऐकून किंवा वाचून सगळेच थक्क होतात.

   

प्रेमाला वयाची मर्यादाही नसते, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. याचाच प्रत्यय देणारी एक घटना नुकतीच समोर आली आहे.प्रेमाच्या अशा अनेक अनोख्या कथा समोर येत असतात, ज्या सगळ्यांनाच हैराण करतात. आता असाच एक किस्सा बिहारमधून समोर आला आहे.

असं म्हणतात, की प्रेमात वय पाहिलं जात नाही. मग भलेही एका वयस्कर व्यक्तीचं एखाद्या तरुणीवर प्रेम जडलं तरीही. सध्या बिहारमधून अशीच घटना समोर आली, जिने सर्वांनाच थक्क केलं. हे प्रकरण बिहारच्या समस्तीपूरमधील आहे. इथल्या एका शिक्षकाचं आपल्याच विद्यार्थीनीवर प्रेम जडलं.

हे वाचा:   prithvi shaw बरोबर हाणामारी करणारी सपना गिल कोण आहे? ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत केलय काम, VIDEO

पुढे जे काही घडलं ते सर्वांनाच थक्क करणारं होतं.दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं. दोघांची ही प्रेमकहाणी लोकांना ऐकायला विचित्र वाटली, मात्र ही घटना खरी आहे. या प्रेमकहाणीची सर्वात हैराण करणारी बाब म्हणजे दोघांच्या वयात 22 वर्षांचा फरक आहे. शिक्षकाचं वय 42 वर्ष आहे. तर, विद्यार्थीनी 20 वर्षांची आहे. या प्रेमकहाणीची सुरुवात कोचिंगमध्येच झाली होती.

इंग्लिशच्या कोचिंगसाठी येणारी विद्यार्थीनी शिक्षकाच्याच प्रेमात पडली. यानंतर दोघांनीही मंदिरात जात विवाह केला. शिक्षकाने गुरुवारी आपल्या विद्यार्थीनीसोबत सात फेरे घेतले. या लग्नाला आसपासचे लोक आणि नवरीसोबत शिकणारे विद्यार्थी हजर राहिले. नंतर या दोघांनी कोर्ट म‌ॅरेजही केलं. या लग्नाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हे वाचा:   'इतका अहंकार चांगला नाही'; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या 'त्या' व्हिडीओवरुन भडकले लोक

शिक्षकाच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं आहे. शिक्षकाने यानंतर दुसरं लग्न केलं नव्हतं, पण त्यांना फार काळ एकटं आयुष्य घालवायचं नव्हतं. याचदरम्यान शिक्षकाचा आपल्या विद्यार्थीनीवर जीव जडला. अखेर या दोघांनीही एकमेकांसोबत सात फेरे घेत मंदिरातच विवाह केला.

Leave a Reply