Bigg Boss 16: बिग बॉसच्या घरात शिव ठाकरेचा रुद्रावतार; निम्रतवर ‘असा’ काढला राग

Uncategorized

बिग बॉस 16′ मध्ये या आठवड्यात एक धक्कादायक एलिमिनेशन होणार आहे, ज्याची कमान घरातील सदस्यांच्या हातात देण्यात आली आहे. म्हणजेच या आठवड्यात घरातून कोणत्या सदस्याला बाहेर काढायचे आहे हे कुटुंबातील सदस्यांनी आपापसात ठरवायचे आहे. या आठवड्यात टीना दत्ता, शालीन भानोत, सौंदर्या शर्मा आणि सुंबुल तौकीर खान नामांकित आहेत.

   

कोणत्याही एका सदस्याचे नाव निवडण्यासाठी कुटुंबातील सदस्यांची परस्पर संमती घ्यावी लागते. मात्र यादरम्यान शिव ठाकरे आणि निमृत कौर अहलुवालिया यांच्यात चांगलीच लढत झाली. संतापलेल्या शिवने असं काही केलं कि त्याच्या कृतीची आता चर्चा होतेय.

बिग बॉस 16 च्या आजच्या एपिसोडमध्ये स्पर्धकांमध्ये चांगलेच वाद होणार आहेत. नुकताच एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये बिग बॉस घरातील सदस्यांना नामांकित सदस्यांपैकी एकाचे नाव देण्यास सांगतात ज्यांना त्यांना बाहेर काढायचे आहे. यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य याबद्दल चर्चा करताना दिसत आहेत.

हे वाचा:   या प्रसिद्ध गायकाला आला हार्ट अटॅक? चाहते चिंतेत तर मॅनेजरने सांगितलं सत्य

प्रियंका चहर चौधरी, शिव आणि इतरांनी एलिमिनेशनसाठी सौंदर्याचे नाव घेतले. पण अर्चना त्याला नकार देत म्हणते ‘सौंदर्या शर्मा सर्व कामे चांगल्या प्रकारे करते आणि प्रत्येक गोष्टीत भाग घेते. त्याला घराबाहेर काढायचं नको.’ अर्चना म्हणते की जर तुम्हाला बाहेरच काढायचं तर शालीनला काढा कारण त्याला घरात राहण्यात काही रस नाही.’ पण या सगळ्या चर्चेत शिव ठाकरेचा आवाज वाढतो. निम्रतला वाटतं की शिव असा का बोलतोय.

निम्रतशिवला म्हणते, ‘तो इतका हायपर का होतोय? हे ऐकून शिव तिला म्हणतो की, तो तिच्याशी बोलत नाही मग ती मध्येच का बोलत आहे. हे ऐकून निमृतचे मन दुखावले जाते आणि म्हणते, ‘ मी इथे भांडण करायला आले नाही. शिव निम्रतला सांगतो की ‘तो भांडण करत नाहीये. फक्त माझा शब्द पाळा. पण निम्रतला राग येतो. यानंतर शिव देखील भडकतो आणि रागात हातातील जॅकेट जमिनीवर फेकतो. आणि म्हणतो, ‘मला तोंड उघडायला लावू नको.’

हे वाचा:   Viral : तिरडी बांधली अन् मयत व्यक्ती सिगारेट ओढू लागला; Video पाहून थरकाप उडेल

बिग बॉसच्या घरात निम्रत आणि शिव यांची खूप घट्ट मैत्री आहे. दोघेही एकाच टीमचा भाग आहेत. शिव आणि निम्रतची मैत्री कालांतराने घट्ट होत गेली. पण या मैत्रीत दुरावा येऊ लागला जेव्हा निम्रतच्या वडिलांनी तिला आणि शिवला वेगळे खेळण्याचा सल्ला दिला. त्यानंतर जेव्हा शिवने प्रियांकाला निम्रतपेक्षा कॅप्टन्सीसाठी अधिक हक्कदार असल्याचे सांगितले तेव्हा गैरसमजातून निम्रत आणि शिव यांच्यात भांडण झाले. तेव्हापासून या दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून भांडताना दिसतात. आता शिव आणि निम्रतची मैत्री टिकते की फिनालेसोबतच ती तुटते हे पाहणं महत्वाचं आहे.

Leave a Reply