अक्षय कुमार करतोय २५ वर्षांनी लहान मृणाल ठाकूरसह रोमान्स; नेटकऱ्यांनी केलं पुन्हा ट्रोल

Uncategorized

२०२२ हे वर्षं अक्षय कुमारसाठी फार वाईट ठरलं, अक्षयचे गेल्यावर्षातील सगळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले. आता लवकरच ‘सेल्फी’ या चित्रपटाने अक्षय त्याच्या यावर्षीच्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. हा एक ड्रामा आणि कॉमेडी चित्रपट आहे आणि यात अक्षय पुन्हा एकदा प्रेक्षकांना अॅक्शन मोडमध्ये बघायला मिळणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं एक नवं गाणं प्रदर्शित झालं आहे. या नव्या गाण्यात अक्षय कुमार अभिनेत्री मृणाल ठाकूरसह अॅक्शन आणि रोमान्स करताना दिसत आहे.

   

नुकतंच ‘सेल्फी’ या चित्रपटातील ‘कुडिया नी तेरी’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. यात अक्षय कुमारचा एक डॅशिंग अवतार बघायला मिळत आहे तर मृणाल ठाकूर अत्यंत बोल्ड आणि ग्लॅमरस अवतारात बघायला मिळत आहे. आपल्या वयापेक्षा २५ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीबरोबर रोमान्स करणाऱ्या अक्षयवर सध्या प्रचंड टीका होत आहे. याआधीसुद्धा याच गोष्टीवरुन अक्षयला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.

हे वाचा:   धोनीच्या पाठोपाठ शिखर धवनचीही बॉलिवूडमध्ये एंट्री, ‘या’ अभिनेत्रीसह क्रिकेटपटू दिसणार रोमँटिक अंदाजात

मध्यंतरी कॉफी विथ करण या शोमध्येसुद्धा अक्षयला याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अक्षयने हसत खेळत उत्तर दिलं होतं, तो म्हणाला, “सहकलाकारांमधील वयाचं अंतर जास्त नसावं असं ज्यांना वाटतं ते सगळे माझ्यावर जळतात. मी तरुण अभिनेत्रींबरोबर काम करू शकतो, मी ५५ वर्षांचा वाटतो का? त्यामुळे मला ही समस्या आजवर कधी नीट समजलीच नाही. जे यावरून मला ट्रोल करतात त्यांना त्यांचं काम करूदे. मी त्याची पर्वा करत नाही.”

अक्षय कुमार हा सध्या ५५ वर्षांचा आहे. सम्राट पृथ्वीराज या चित्रपटात त्याने त्याच्यापेक्षा ३० वर्षांनी लहान अशा मानुषी चिल्लरबरोबर काम केलं. आता पुन्हा आपल्यापेक्षा २५ वर्षांहून लहान मृणाल ठाकूरबरोबर पडद्यावर रोमान्स, धमाल, अॅक्शन करताना पाहून नेटकऱ्यांनी पुन्हा त्याला ट्रोल करायला सुरवात केली आहे. अक्षयच्या आगामी ‘सेल्फी’मध्ये इम्रान हाश्मी, डायना पँटी आणि नुशरत भरूचा हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट २४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply