अखेर समोर आली राखी सावंतची सवत; आदिलबरोबर अफेअर करणारी तनु आहे तरी कोण?

Uncategorized

अभिनेत्री राखी सावंत तिच्या लग्नामुळे मागच्या एक महिन्यापासून चर्चेत आहे. राखीनं बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानी बरोबर लग्न केलं. आधी लग्नाची बातमी आली. मग नवऱ्याला लग्न मान्य नव्हतं. ते नाटक थांबत नाही तर पुन्हा आदिल विरोधात राखीनं अनेक गोष्टी सांगितल्या. आदिलचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचा खुलासा राखीनं आधीच केला होता.

   

मात्र अखेर राखीनं आदिलबरोबर फिरणाऱ्या त्या मुलीचं नावं आणि तिची संपूर्ण माहिती समोर आणली आहे. आदिल ज्या मुलीबरोबर रिलेशनमध्ये आहे तिची नाव घेत राखीनं तिच्यावर गंभीर आरोप केलेत. त्याचप्रमाणे दोघांचे व्हिडीओ, फोटो आणि चॅटिंगचे स्क्रिनशॉर्ट्स माझ्याकडे आहेत आणि ते मी योग्य वेळी मीडियासमोर आणेन असं राखीनं म्हटलं आहे.

राखी सावंतनं मीडियासमोर येत नवऱ्याच्या गर्लफ्रेंडचं नवा सांगितलं आहे. आदिल खानच्या गर्लफ्रेंडचं नाव तनु असं आहे. राखी बिग बॉस मराठीमध्ये असताना आदिलचं तनुबरोबर अफेअर सुरू होतं. पाच आठवड्यांनी राखी बिग बॉसमधून बाहेर आली तेव्हा तिला याची माहिती मिळाली.

आदिलचं अफेअर असल्याचं कळताच राखीन त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण तो समजून घेण्यास तयार नव्हता. लग्नाची माहिती देखील आदिलमुळे राखीनं लपवून ठेवली होती. पण अखेर कंटाळून राखीनं आदिलत्या गर्लफ्रेंडचं नाव सांगून टाकलं.

हे वाचा:   Video : गाढ झोपलेल्या नवऱ्याबरोबर कतरिना कैफने केलं असं काही की…; बेडरूममधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर तनु आणि आदिल यांचे अनेक फोटो पाहायला मिळत आहेत. राखीनं दिलेल्या माहितीनुसार, तनु ही इंदौरला राहणारी आहे. तिथे तिचा एक फ्लॅट आहे. तिच्याकडे स्वत:ची BMWआहे. तनु IIT पासआऊट असून तिचा स्वत:चा बिझनेस आहे. त्याचप्रमाणे तनु मागच्या 8 वर्षांपासून बॉलिवूडमध्ये येण्यासाठी प्रयत्न करत आहे. काही छोट्या छोट्या प्रोजेक्टमध्ये ती दिसली देखील होती. तिचं वय आता 37 वर्ष इतकं आहे.

राखीनं आदिलच्या गर्लफ्रेंडवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तनु त्याला माझ्या विरोधात भडकवून तिला मार आणि माझ्याकडे ये असं सांगते, असं राखीनं म्हटलंय. तिनं आणखी एक व्हिडीओ शेअर केलाय ज्यात तिनं म्हटलंय, ‘माझा स्ट्रेस आता संपला. आता तनु आणि आदिलचा स्ट्रेस सुरू. आदिलनं अखेर ठरवलं आहे की तो तनुबरोबर राहणार आहे. कालच तो म्हणाला आहे की मी जातोय. मी तिच्याबरोबरच राहणार आहे’.

हे वाचा:   'इतका अहंकार चांगला नाही'; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या 'त्या' व्हिडीओवरुन भडकले लोक

राखीनं पुढं म्हटलंय, ‘आदिल खान दुर्रानीचा खरा चेहरा आता सर्वांना दाखवणार आहे. मैसूरमध्ये त्याच्यावर किती केसेस आहेत आणि कोण कोणत्या मुलींनी केल्या आहेत सगळं सांगणार आहे. मी आता कोणालाही घाबरत नाही. मी मीडियासमोर येणार, देशासमोर येणार’.

Leave a Reply