अजिंक्य रहाणेचा संयम सुटला! बीसीसीआय संघात जागा देत नाही ​​म्हणून या देशाच्या संघाकडून खेळणार

Uncategorized

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी आणि दमदार फलंदाज अजिंक्य रहाणे बऱ्याच काळापासून संघापासून दूर आहे. याचा रणजी ट्रॉफीचा सीझन तसा ठीकठाक होता असंच म्हणता येईल. यामुळेच त्याला संघामध्ये पुन्हा स्थान मिळवणे आता कठीण असल्याचे दिसत आहे. अजिंक्य रहाणेने गेल्या वर्षी जानेवारीमध्ये भारताकडून शेवटचा खेळला होता. त्यामुळे आता भारतीय संघात स्थान मिळत नसल्याने तो दुसऱ्या देशामधून क्रिकेट खेळताना दिसणार आहे. पाहूया नेमका काय प्रकार आहे.

   

भारताचा हा दमदार फलंदाज आता इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. लीसेस्टरशायरने त्याचा संघात समावेश केला आहे, ज्याची त्यांनी अधिकृत घोषणाही केली आहे. याचसोबत रहाणे लीसेस्टरशायर संघाचे नेतृत्त्व देखील करणार आहे. या क्लबच्या म्हणण्यानुसार, अजिंक्य इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सीझननंतर आठ काऊंटी सामने आणि वन डे चषकाच्या संपूर्ण हंगामासाठी संघाकडून सामने खेळणार आहे.

आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रहाणेने लीसेस्टरशायर क्रिकेट संघाच्या वेबसाइटवर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘आगामी हंगामासाठी लीसेस्टरशायरमध्ये सामील होताना मला आनंद होत आहे. मी माझ्या नवीन सहकाऱ्यांसोबत खेळण्यासाठी आणि लीसेस्टर शहराचा आनंद घेण्यासाठी उत्सुक आहे.

हे वाचा:   सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करणं पडलं महागात, आता रवीना टंडनची होणार चौकशी

लीसेस्टरशायर संघाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘३४ वर्षीय अजिंक्य रहाणेचा संघात समावेश करताना आनंद होत आहे. तो आयपीएल (IPL 2023) नंतर जूनमध्ये संघात सामील होईल. तो LV = इन्शुरन्स काउंटी चॅम्पियनशिप सामन्यांसाठी उपलब्ध असेल आणि एकदिवसीय चषक देखील खेळेल.’

अजिंक्य रहाणे खूप अनुभवी फलंदाज म्हणून ओळखला जातो, त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. अजिंक्यने भारतासाठी एकूण १९२ आंतरराष्ट्रीय सामने (सर्व फॉरमॅटमध्ये) खेळले आहेत. रहाणेने ८२ कसोटी सामन्यात ४९३१ धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत १२ शतके आणि २५ अर्धशतके झळकावली आहेत. एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे तर अजिंक्यने ९० सामन्यांमध्ये २९६२ धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणेच्या आगमनाने लीसेस्टरशायर संघातील फलंदाजी बाजू मजबूत होईल.

हे वाचा:   दिवाळीच्या या दिवशी पाकिटात गुपचूप ठेवा ही 1 वस्तू; पाकीट नेहमी भरलेलं राहील..लक्ष्मी सदैव सोबत राहील..जाणून घ्या

बीसीसीआयकडून संधी नाही

बीसीसीआय सध्या अजिंक्य रहाणेला राष्ट्रीय संघात स्थान देताना दिसत नाही आहे. काही काळापूर्वी अजिंक्य रहाणेला कसोटी संघात स्थान मिळत होते, मात्र आता तो त्यामधूनही बाहेर पडला आहे. अजिंक्य रहाणे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा भाग नाही. तो आता फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. केकेआरने संघाने त्याला रिलीज केले. आयपीएल (IPL 2023) साठी झालेल्या लिलावात अजिंक्य रहाणेला चेन्नई सुपर किंग्जने मूळ किमतीत (५० लाख रुपये) खरेदी केले आहे.

रहाणे वापरणार पुजाराचा फॉर्मुला?

टीम इंडियातून वगळल्यानंतर पुजाराने काऊंटी क्रिकेटमध्ये आपल्या बॅटने धुमाकूळ घातला. शतकांचा वर्षाव करताना टीम इंडियाने धमाकेदार पुनरागमन केले. माजी उपकर्णधार रहाणेही असाच काहीसा प्रयत्न करणार आहे. रहाणेने २०१९ मध्ये हॅम्पशायरचे प्रतिनिधित्व केले होते जेव्हा त्याने नॉटिंगहॅमशायरविरुद्ध त्याच्या काऊंटी पदार्पणात शतक केले होते.

Leave a Reply