अन् संजय दत्त ऋषी कपूर यांना मारहाण करायला घरी पोहोचला होता, नितू कपूर यांनी केली मध्यस्थी

Uncategorized

अंबानी कुटुंबाची सून असणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री टीना मुनिम यांचा आज वाढदिवस (Tina Munim Birthday) आहे. धीरुभाई अंबानी यांचे छोटे चिरंजीव अनिल अंबानी (Anil Ambani Wife) यांच्या पत्नी असणाऱ्या टीना अंबानी (Tina Ambani) यांनी एकेकाळी बॉलिवूड गाजवलं होतं. आपल्या सौंदर्याने अनेकांना भुरळ पाडणाऱ्या टीना अंबानी सध्या बॉलिवूडपासून दूर आहेत. मात्र त्यांचे चित्रपट, गाणी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, एकदा टीना मुनिम यांच्यासाठी संजय दत्त (Sanjay Dutt) ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांना त्यांच्या घरी जाऊन मारहाण करत होता. जाणून घ्या हा किस्सा नेमका काय आहे.

   

ऋषी कपूर यांनी आपल्या ‘Kapoor & Sons’ आत्मचरित्रात अनेक खुलासे केले होते. त्यामध्येच त्यांनी टीना मुनिम यांच्यामुळे संजय दत्त कशाप्रकारे आपल्याला घरी येऊन मारहाण करण्याची योजना आखत होता याची माहिती दिली आहे. त्यावेळी ऋषी कपूर अविवाहित होते आणि बॉलिवूडमध्ये चांगलंच नाव कमावलं होतं. 

हे वाचा:   कोमट पाणी कोणी प्यावं, कोणी पिवू नये? डॉक्टर देतात मोलाचा सल्ला...

संजय दत्त आणि टीना मुनिम यांनी ‘रॉकी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर दोघांचंही अफेअर सुरु होतं. रॉकी चित्रपटानंतर संजय दत्त आणि टीना दोघांनाही यश मिळालं आणि सोबत अनेक चित्रपटही मिळाले. टीना आणि ऋषी कपूर यांच्या जोडीलाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं होतं. यादरम्यान संजय दत्तला त्या दोघांचं अफेअर सुरु असल्याची शंका आली. यानंतर त्याने घरी जाऊन ऋषी कपूर यांना मारहाण करण्याचं ठरवलं होतं. 

संतापलेल्या संजय दत्तने आपला मित्र गुलशन ग्रोव्हरला आपल्यासह ऋषी कपूर यांच्या घऱी येण्यास सांगितलं होतं. पण नंतर हा फक्त गैरसमज असल्याचं स्पष्ट झालं. ऋषी कपूर आणि नितू सिंग यांच्यात प्रेमसंबंध असल्याची माहिती संजय दत्तला मिळाली आणि त्याने माघार घेतली. 

हे वाचा:   राखी सावंतच्या मदतीसाठी सलमान खान नेहमी पुढे का येतो? काय आहे दोघांचं नातं, जाणून घ्या

“संजय दत्त आणि मी भावासारखे आहोत. एकदा त्याने मला चिंटूच्या (ऋषी कपूर) घरी जाऊन त्याला मारहाण करायचं असल्याचं सांगितलं. आम्ही तिथे पोहोचलोही होतो. पण नितू सिंग यांनी आम्हाला त्यांच्यात प्रेमप्रकरण सुरु असल्याचं सांगितलं आणि आम्ही तेथून निघालो,” असा दुजोरा गुलशन ग्रोव्हरने एका मुलाखतीत दिला होता.

पण नंतर वेळेसोबत संजय दत्त आणि ऋषी कपूर यांच्यातील शत्रुत्व संपलं आणि मैत्री झाली. विशेष म्हणजे ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूरने ‘संजू’ चित्रपटात संजय दत्तची भूमिका निभावली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला. 

पण नंतर वेळेसोबत संजय दत्त आणि ऋषी कपूर यांच्यातील शत्रुत्व संपलं आणि मैत्री झाली. विशेष म्हणजे ऋषी कपूर यांचा मुलगा रणबीर कपूरने ‘संजू’ चित्रपटात संजय दत्तची भूमिका निभावली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला.

Leave a Reply