असा झाला प्रेमकथेचा धक्कादायक शेवट, अमिताभ-रेखाच्या लव्हस्टोरीला जया बच्चन यांनी कसा लावला ब्रेक?

Uncategorized

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) यांची लव्ह स्टोरी विषयी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच माहित आहे. त्या दोघांमध्ये ऑनस्क्रिनच नाही तर ऑफ स्क्रिन असणारी केमिस्ट्री देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अमिताभ आणि रेखा या दोघांनी सगळ्यात आधी 1976 साली प्रदर्शित झालेल्या ‘दो अंजाने’ (Do anjaane) या चित्रपटात एकत्र मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले होते. पण त्या दोघांमध्ये असा दुरावा आला की ते पुन्हा एकत्र पडद्यावर दिसले नाहीत.

अमिताभ बच्चन आणि रेखा (Amitabh-Rekha Love Story) यांनी चित्रपटातून कधीही त्यांच्या प्रेमाची कबुली दिली नाही. पण त्या काळात त्यांच्या अफेअरच्या अफवा आगीसारख्या पसरल्या आणि जया बच्चन यांना कळल्यावर गदारोळ होणे निश्चितच होते पण तसे झाले नाही. कारण या दोघांच्या प्रेमकहाणीचा ज्या प्रकारे अंत झाला ते देखील एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. याचे धागेदोरे देखील अमिताभ यांच्याच घरी विणले गेले आहेत.

हे वाचा:   मोठी बातमी;अक्षय कुमारने 19 महिन्यात बुडवले निर्मात्यांचे तब्बल 300 कोटी रुपये; नेमकं काय चुकतंय?

दरम्यान या दोघांच्या अफरचे किस्से जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या कानावर पोहोचत होते. सुरुवातीला जया बच्चन यांनी या विषयाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा प्रकरण मर्यादेपलीकडे वाढू लागले, तेव्हा त्यांनी शांत राहून जे काही केले जे कदाचित आक्षेप घेऊनही केले जाऊ शकले नसते. त्यावेळी जया बच्चन यांनी रेखाला आपल्या घरी जेवायला बोलावले होते. त्यावेळी अमिताभ मुंबईत नव्हते तर शूटिंगच्या निमित्ताने बाहेर होते. त्यावेळसं रेखाला वाटलं होतं की जया बच्चन तिसरी महिला असल्यासारखे टोमणे मारेल.

रेखा जया यांचे आमंत्रण स्वीकारले आणि त्या डिनरसाठी बच्चन हाऊसमध्ये पोहोचल्या. रात्रीच्या जेवणादरम्यान दोघांमध्ये खूप चर्चा झाली आणि यादरम्यान अमिताभ यांच्याबद्दल काहीही बोलणे झाले नाही. पण जेवल्यानंतर जया बच्चन रेखाला बाहेर सोडायला आल्या तेव्हा त्यांनी असे काही केले की त्यानंतर अमिताभ आणि रेखा यांचे मार्ग कायमस्वरूपीसाठी वेगळे झाले.

हे वाचा:   'घरभाडं द्यायला गेलं आणि त्या नगरसेवकानं मला...', तेजस्विनी पंडितचा धक्कादायक खुलासा

जया बच्चन काय म्हणाल्या?

 माध्यमांच्या माहितीनुसार, जया बच्चन रेखाला बाहेर सोडायला आल्या तेव्हा म्हणाल्या की, त्या अमितला कधीच सोडणार नाहीत आणि ही गोष्ट ऐकून रेखाला धक्का बसला होता. अमिताभ यांच्यासोबतचे त्यांचे नाते कधीच परिपूर्ण होणार नाही, हेही त्यांना कदाचित समजले असेल. त्यामुळेच दोघांनीही आपले नाते वेगळे केले आणि आजपर्यंत तो मार्ग तसाच चालू आहे. 

Leave a Reply