आठ वर्षांचा संसार, पहिल्या पत्नीशी घटस्फोट, एक मुलगी अन्…; नवीन ‘तारक मेहता’ने थाटामाटात केलं दुसरं लग्न, फोटो व्हायरल

Uncategorized

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘कुमकुम- एक प्यारा सा बंधन’ ही मालिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. या मालिकेमधील कलाकारांनाही बरीच प्रसिद्धी मिळाली. या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला चेहरा म्हणजे जुही परमार. जुही व अभिनेता सचिन श्रॉफ यांनी खऱ्या आयुष्यात एकमेकांशी लग्न केलं. मात्र आठ वर्ष सुखी संसार केल्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. आता सचिनने दुसरं लग्न केलं आहे.

   

२५ फेब्रुवारीला (शनिवार) सचिन व चांदणीचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. या विवाहसोहळ्या अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेमध्ये सचिन तारक मेहता ही भूमिका साकारत आहे. सचिनच्या लग्नाला या मालिकेमधील बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती.

सचिनच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यावेळी त्याच्या पत्नीने निळ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला होता. तर सचिनने भगव्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. टीव्ही विश्वामधील अनेक कलाकार मंडळींनी सचिनच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत.

२००९मध्ये सचिनने जुहीशी लग्न केलं होतं. पण जुहीचं माझ्यावर प्रेम नसल्याचं सचिनने एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. याच कारणामुळे हे दोघं एकमेकांपासून विभक्त झाले. सचिनला एक मुलगीही आहे. २०१८मध्ये जुही व सचिन यांचा घटस्फोट झाला. सचिनची पत्नी ही एक इवेंट मॅनेजर तसेच इंटेरियर डिझायनर म्हणून काम करते.

हे वाचा:   IND vs NZ : गर्लफ्रेंड गमावली...टीम इंडिया कमावली, जाणून घ्या कोण आहे `हा` क्रिकेटपटू

Leave a Reply