आशुतोष राणाआधी मराठीतील या दिग्दर्शकासोबत रेणुका शहाणेंनी थाटला होता संसार; का झाला घटस्फोट?

Uncategorized

भारतीय चित्रपटसृष्टीतील आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे हे जोडपं चांगलंच लोकप्रिय आहे. दोघांकडेही आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. दोघांच्या लग्नाला तब्बल 22 वर्ष पूर्ण झाले आहेत. दोघांनी 2000 साली एकमेकांशी लग्नगाठ बांधली होती. आज दोघेही सुखी संसार करत आहेत.

   

मात्र आज आम्ही रेणुका शहाणे यांच्याबद्दल एक माहिती नसलेली गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत. हे ऐकून तुम्हाला चांगलाच धक्का बसेल. रेणुका यांनी नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी एक खुलासा केला आहे.

रेणुका शहाणे यांनी मिड डेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, ‘आशुतोषसोबतचे त्यांचे लग्न महिनाभरही टिकणार नाही, असा असं त्यांच्या जवळचे लोक आणि नातेवाईक म्हणत होते. कारण आशुतोषची कौटुंबिक पार्श्वभूमी पूर्णपणे वेगळी होती. रेणुका महाराष्ट्रातील होती, तर आशुतोष राणा मध्य प्रदेशातील एका छोट्या गावातील रहिवासी होते. त्यांचे कुटुंब सुद्धा खूप मोठे होते. रेणुकाच्या कुटुंबीयांना ती त्यांच्या संस्कृतीशी जुळवून घेईल की नाही अशी भीती वाटत होती.

हे वाचा:   आलियाला मिळाला डिस्चार्ज; पती रणबीर अन् लेकीसह रुग्णालयातून घरी जातानाचा व्हिडीओ व्हायरल

रेणुका शहाणे या आशुतोष राणासोबत दुसरे लग्न करणार होत्या. यासाठी त्यांनाही खूप काळजी घ्यावी लागली. खूप विचार करून त्या आशुतोष यांच्यासोबत लग्नासाठी तयार झाल्या. रेणुका यांना लग्न म्हणजे जुगारच वाटत असे. हे लग्न टिकेल की नाही याची शाश्वती त्यांना देखील नव्हती असा खुलासा रेणुका शहाणे यांनी केला आहे. पण आशुतोष राणा हे रेणुका यांचे चांगले मित्र झाले आणि चांगले मित्र नेहमीच चांगले भागीदार नसतात असं त्यांचं म्हणणं आहे.

रेणुका शहाणेने आशुतोष राणासोबत लग्न केले. दोघेही एकमेकांचे वेळोवेळी कौतुक करताना दिसतात. रेणुकाने लग्न झाल्यावर आशुतोषच्या कुटुंबाच्या सगळे रीती रिवाज आणि परंपरा जाणून घेतल्या. रेणुका त्यांच्या पहिल्या लग्नापासून खूप काही शिकल्या होत्या. त्यामुळेच त्यांना थोडा वेळ लागला पण त्याने आशुतोष आणि त्याच्या कुटुंबाशी लवकरच जमवून घेतलं.

हे वाचा:   “१०० कोटी देतो, कुत्र्याबरोबर सेक्स…”, आहाना कुमराने साजिद खानवर केले होते गंभीर आरोप

रेणुका शहाणे यांचे पहिले पती कोण आहेत?

आशुतोषच्या आधी रेणुका यांचा विवाह विजय केंकरे यांच्याशी झाला होता. विजय केंकरे हे मराठी रंगभूमीवरचे प्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. विजय आणि रेणुका यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. दोघांचाही लग्नानंतर लवकरच घटस्फोट झाला. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की विजय यांना रेणुकाने मराठी चित्रपटांव्यतिरिक्त कोठेही काम करावे असे वाटत नव्हते.

त्यांनी केवळ मराठीमध्येच काम करावे अशी त्यांची इच्छा होती. अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला होता की, विजय यांच्या अहंकारीपणामुळे दोघांमध्ये अनेक वाद झाले. त्यानंतर दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला.

Leave a Reply