करिअरसाठी सोडलं पतीला; इंटिमेट सीनमुळे तुफान चर्चा, संघर्षात जगली आयुष्य

Uncategorized

अभिनेता अजय देवगणच्या ‘भोला’ या चित्रपटातील पहिलं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ‘नजर लग जाएगी’ असं या गाण्याचं नाव आहे. या गाण्यात अजय साऊथ अभिनेत्री आमला पॉलसोबत रोमान्स करताना दिसतोय.

   

भोला चित्रपटात आमला पॉलची एण्ट्री म्हणजे चाहत्यांसाठी मोठं सरप्राइज होतं. कारण या चित्रपटासोबत तिचं नाव जोडलं गेलं नव्हतं आणि कोणतीच चर्चा नव्हती. त्यामुळे भोलामध्ये तिची काय भूमिका असणार, याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

आमला पॉल ही साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती मॉडेल आणि निर्मातीसुद्धा आहे. 2008 मध्ये एका मल्याळम चित्रपटातून तिने अभिनयातील करिअरची सुरुवात केली.

आमला त्यावेळी सर्वाधिक चर्चेत आली होती, जेव्हा ‘आदाई’ या चित्रपटात तिने इंटिमेट सीन शूट केला होता. आमलासाठी हे सीन शूट करणं सोपं नव्हतं, कारण जवळपास 15 लोकांसमोर तिला ते शूट करायचं होतं.

हे वाचा:   विवेक ओबेरॉय चा ऐश्वर्या रॉय बद्दल मोठा खुलासा,म्हणाला मी डिप्रेशनमध्ये गेलो आणि आ,त्म-हत्या.....

आमलाने चित्रपटासाठी तो इंटिमेट सीन शूट केला खरा, पण त्यानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यामुळे ती वादात सापडली. हा वाद नंतर इतका वाढला की तिने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता.

आमलाने तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही नशीब आजमावलं. तिला अभिनयावर प्रचंड प्रेम होतं. मात्र लग्नानंतर सासरच्यांनी तिला चित्रपटसृष्टीत काम करण्यास नकार दिला. अॅक्टिंग सोडून घर सांभाळण्याचा सल्ला त्यांनी दिला होता.

सासूच्या या अटीनंतर आमलाने कुटुंब आणि करिअर यापैकी एक गोष्ट निवडली. तिने तिचं प्रेम म्हणजेच करिअरची निवड केली आणि पती विजयला घटस्फोट दिला.

आता भोला या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी तिने महेश भट्ट दिग्दर्शित ‘रंजीश ही सही’ या वेब सीरिजमध्ये काम केलंय.

Leave a Reply