कार सेक्स ते रात्री विवस्त्र होऊन झोपणं… Shahid Kapoor च्या पत्नीनं केले होते धक्कादायक खुलासे

Uncategorized

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) उद्या 25 फेब्रुवारी रोजी त्याचा 41 वा (Shahid Kapoor Birthday Special) वाढदिवस साजरा करणार आहे. शाहिद हा विवाहित आहे. इतकंच काय तर त्याला दोन मुलं देखील आहेत. तरीही आज लाखो मुली या त्यांच्या चाहत्या आहेत. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी आहे. शाहिदनं आजवर अनेकांना डेट केलं. मात्र, लग्न हे वयानं 13 वर्षांनी लहान असलेल्या मीराशी केलं.

मीरा ही एक सर्वसाधारणं मुलगी होती. तिनं कधी विचारही केला नव्हता की तिचं लग्न शाहिदशी होईल. लग्नानंतर मीरा तिच्या लग्नाविषयी कधीच मीडियाशी बोलली नाही. त्या दोघांविषयी जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक होते. दरम्यान, करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये मीरानं त्या दोघांच्या खासगी आयुष्याविषयी अनेक खुलासे केले. या सगळ्या गोष्टी ऐकून शाहिदच्या चाहत्यांना धक्काच बसला होता. कारण मीराने शाहिदसोबतच्या तिच्या सेक्स, रिलेशनशिपबद्दल खुलासा केला होता. (Shahid Kapoor Wife Mira Rajput)

हे वाचा:   “तैमूरला सांभाळणाऱ्या नॅनीला किती पगार मिळतो?”, नीतू कपूर म्हणतात “एक कोटी…”

मीराने हा खुलासा करण जोहरच्या कॉफी विथ करण’ या शोमध्ये केला होता. या शो मधील एका एपिसोडमध्ये शाहिद आणि मीरा यांनी हजेरी लावली होती. मीरा पहिल्यांदाच टीव्ही शोद्वारे लोकांसमोर आली होती. या शोमध्ये करण हा नेहमीच येणाऱ्या पाहुण्यांच्या सेक्स लाइफ विषयी प्रश्न विचारतो आणि त्यानं शाहिद आणि मीरासोबतही तसंच केलं. यावेळी मीरा तिच्या आणि शाहिदच्या सेक्स लाइफविषयी मनमोकळेपणाने बोलली आहे.

शोमध्ये करणच्या एका प्रश्नावर मीराने सांगितले की, दोघांनी कार सेक्स केलं होतं. मीराने जेव्हा हे गुपित उघड केलं. मीरानं हे गुपित उघड करताच शाहिदनं तिला प्रश्न केला की हे कधी झाले. तेव्हा मीरा शाहिदकडे लाजून बघत राहिली आणि काहीच बोलली नाही. यासोबतच शाहिदने खुलासा केला की, तो कधी कधी विवस्त्र झोपतो. त्यावेळी मीराने सांगितले की, जेव्हा तो विवस्त्र झोपतो तेव्हा तो कम्फर्टेबल असतो. 

हे वाचा:   पतंजलीची ऑनलाईन बैठक; देश-विदेशातील अनेक जण हजर; पुण्यातून पॉर्न व्हिडीओ सुरू झाला अन्...

करण जोहरने शाहिद आणि त्याचे लग्न मोडले तर त्याचे काय कारण असू शकते असे विचारले. त्यावर उत्तर देत मीरा म्हणाली की ते दोघे एकमेकांच्या आयुष्यात थोडीपण ढवळाढवळ करत नाही. त्यामुळे जर कधी त्यांचं लग्न मोडलं तर त्याचं एकच कारण असेल आणि ते म्हणजे फसवणूक.

Leave a Reply