कोण होतीस तू काय झालीस तू! बाहुबली फेम अनुष्का शेट्टीची झाली अशी अवस्था, नवे Photo पाहून चाहत्यांना धक्का

Uncategorized

एसएस राजामौली (S. S. Rajamouli) यांच्या बाहुबली (Bahubali) चित्रपटाने इतिहास रचला. बाहुबली आणि बाहुबली 2 ने बॉक्स ऑफिसवर (Box Office) विक्रमांचे इमले रचले. बाहुबली 600 कोटींच्या तर बाहुबली 2 हजार कोटींच्या घरात गेला. या चित्रपटात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला वेगळी ओळख मिळाली. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे अनुष्का शेट्टी (Anushka Shetty). बाहुबली चित्रपटात अनुष्का शेट्टीने साकारलेली देवसेना (Devsena) अजरामर झाली. देवसेनाच्या भूमिकेतल्या अनुष्का शेट्टीच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं होत. 

   

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री
अनुष्का शेट्टी ही दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री (South Actress) आहे. आपल्या कारकिर्दीत तीने अनेक सुपरहिट चित्रपट (Superhit Movies) दिले. अनेक चित्रपटांमध्ये तीने आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत. पण बाहुबली चित्रपटातील देवसेनाचं पात्र चाहत्यांच्या विशेष लक्षात राहिलंय. या चित्रपटात राणीच्या वेशातील तीचं सौंदर्य आजही चाहत्यांच्या डोळ्यासमोरुन हटलेलं नाही. पण सोशल मीडियावर अनुष्का शेट्टीचे नवे फोटो व्हायरल झाले असून हे फोटो पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे. या फोटोंमुळे अनुष्का शेट्टी मोठ्याप्रमाणावर ट्रोल होतेय.

हे वाचा:   पाणी पुरी की पिठलं भाकरी? देशमुखांच्या सुनेला आवडतात या गोष्टी

अनुष्काचे नवे फोटो पाहून चाहते हैराण
महाशिवरात्रीच्या निमित्ताने अनुष्का शेट्टी मंदिरात आली होती. यावेळी तीने पांढऱ्या रंगाचा सलवार सूट परिधान केला होता. अनुष्काने भगवान शंकराची आराधना केली आणि काही वेळ मंदिरात घालवला. यादरम्यान तिला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती. काही जणांनी आपल्या मोबाईलमध्ये तिचे फोटो कैद केले. त्यानंतर हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हायरल होणाऱ्या फोटोत अनुष्का अजिबात ओळखू येत नाहीए. तीचं वजन चांगलंच वाढल्याचं पाहिला मिळतंय. बॉडि शेमिंगवरुन सोशल मीडियावर तिला ट्रोल केलं जातंय. अनेकांनी तिला वजन कमी कर आम्हाला आधी सारखी अनुष्का पाहायचीय असा सल्ला अनेक चाहत्यांनी दिलाय. 

बराच काळानंतर अनुष्का सार्वजनिक ठिकाणी दिसली. अनुष्का शेट्टीला प्रत्यक्ष पाहिला मिळाल्याने चाहते खुश होते, पण दुसरीकडे तिच्या वाढलेल्या वजनामुळे चाहत्यांना धक्काही बसला होता. व्हायरल होणाऱ्या फोटोंवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने म्हटलंय, तुझं वाढलेलं वजन पाहून खूप वाईट वाटतं, प्लीज थोडी स्लिम हो. एका युजरने म्हटलं अनुष्का शेट्टी आणि इलियाना दोघीही माझ्या फेव्हरेट आहेत, पण दोघीही आता जाड झाल्या आहेत. पण काही युजर्सने अनुष्काला वजनावरुन ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं आहे. 

Leave a Reply