तिसऱ्या टी20 नंतर टीम इंडियात राडा, ईशान किशाने शुभमन गिलला मारली कानाखाली, Video व्हायरल

Uncategorized

नव्या वर्षात टीम इंडियाची (Team India) दमदार सुरुवात झाली आहे. श्रीलंकेपाठोपाठ भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडला वन डे आणि टी20त मालिकेतही धुळ (India Beat New Zealand) चारली. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात शतक ठोकणाऱ्या युवा फलंदाज शुभमन गिलचं (Shubhaman Gill) सर्वत्र कौतुक होतंय.

या विजयानंतर भारतीय संघ जल्लोष साजरा करतंय. पण यादरम्यान, ईशान किशन (Ishan Kishan), शुभमन गिल आणि युजवेंद्र चहलचा (Yuzvendra Chahal) एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral on Social Video0 होतोय.

किशनने गिलच्या कानाखाली मारली


न्यूझीलंडविरुद्धच्या तिसरी टी20 भारताने जिंकली आणि मालिकाही खिशात घातली. यानंतर टीम इंडियाने जल्लोष साजरा केला. पण जल्लोष साजरा होत असतानाच टीम इंडियाच्या दोन युवा खेळाडूंमध्ये राडा झाला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये टीम इंडियाचा विकेटकिपर आणि फलंदाज ईशान किशन हा शुभमन गिलच्या कानाखाली मारताना दिसत आहे. इतकंच नाही तर ईशाने बूट घालून शुभमनच्या बेडवरही उड्या मारल्या. 
 
इन्स्टाग्रामवर व्हिडिओ 


शुभमनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यासोबत त्याने एक कॅप्शनही लिहिला आहे. रोडीज रीलोडेड या आपल्या आवडत्या चित्रपटातील एक सीन रिक्रिएट केला आहे. व्हिडिओत इशान किशन गिलला म्हणतो तुझ्यात संयम आणि तीव्रता हवी आहे, उत्तरादाखल शुभमनही माझ्यात संयम आणि तीव्रता असल्याचं सांगतो.

यानंतर ईशान किशन शुभमनच्या डोक्यावरुन त्याच्या बेडवर उडी मारतो. बेडवरुन खाली उतरल्यानंतर तो शुभमनला थप्पड मारयला सांगतो आणि स्वत:ही शुभमनला थप्पड मारतो. हा धमाल व्हिडिओ त्यांनी बनवला आहे. या व्हिडिओत युजवेंद्र चहलही मस्ती करताना दिसत आहे. 

हे वाचा:   अनुष्का शर्माच्या आधी या अभिनेत्रींच्या प्रेमात पडला होता विराट कोहली, नावं वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

शुभमन गिलचा विक्रम


शुभमन गिलने केलेल्या नाबाद 126 धावा आणि भेदक गोलंदाजीसमोर भारताने तिसऱ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडचा 168 धावांनी दणदणीत पराभव केला. तीन टी20 सामन्यांची मालिका भारताने 2-1 अशी जिंकली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच भारताने श्रीलंकेला 3-0 असा व्हाईटवॉश दिला होता. 

Leave a Reply