त्या’ फोटोमुळे एका क्षणात संपलं मंदाकिनीचं करिअर; आता काय करते अभिनेत्री?

Uncategorized

‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमातून लोकप्रियता मिळवलेली अभिनेत्री मंदाकिनी आजही चर्चेत असते. या सिनेमानं नवोदित मंदाकिनीला इंडस्ट्रीत एका रात्रीत स्टार बनवलं. सिनेमातील तिचा अभिनय तर सर्वांना आवडला. मात्र सिनेमातील काही सीन्समुळे ती कायमच चर्चेत राहिली. मध्यंतरी तिनं सिनेमातील बोल्ड सीन्सवेळी तिचं शोषण झाल्याचा खुलासा देखील तिनं केला होता. मंदाकिनी एकेकाळची बॉलिवूडची स्टार अभिनेत्री होती. पण तिची एक चूक तिला भोवली आणि यशाच्या शिखरावर पोहोचलेलं तिचं करिअर एका क्षणात संपुष्टात आलं. एका फोटोनं चांगलीच खळबळ उडवून दिली. या फोटोनं प्रेक्षकांच्या मनात मंदाकिनीविषयी असलेली प्रतिमा खराब झाली.

   

‘राम तेरी गंगा मैली’ सिनेमानं मंदाकिनी चांगलीच प्रसिद्ध झाली. पण इतकी सुंदर अभिनेत्री अचानक इंडस्ट्रीपासून दूर का गेली असा प्रश्न अनेकांना पडला. पण एका व्हायरल फोटोनं मंदाकिनीच्या आयुष्यात होत्याचं नव्हतं केलं. तो फोटो होता अभिनेत्री मंदाकिनी आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांचा. दाऊद इब्राहिमबरोबर मैत्री करणं ही मंदाकिनीच्या आयुष्यातील खूप मोठी चूक होती असं म्हटलं जातं. दाऊदबरोबरच्या मैत्रीमुळे मंदाकिनीच्या करिअरला मोठा परिणाम झाला. दोघांच्या नात्याच्या चर्चा झपाट्यानं होऊ लागल्या.

हे वाचा:   देवमाणूस फेम किरण गायकवाड प्रेमात? या अभिनेत्रीसोबतचा रोमॅन्टिक व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल

1994मध्ये दुबईच्या क्रिकेट स्टेडिअमध्ये दाऊद इब्राहिमबरोबर मंदाकिनीला पाहण्यात आलं. तिथला दोघांचा फोटो चांगलाच व्हायरल झाला ज्यानं इंडस्ट्रीमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. हा फोटो केवळ बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नाही तर संपूर्ण देशात व्हायरल झाला होता. याचा परिणाम अखेर मंदाकिनीच्या करिअरवर झाला.

मीडिया रिपोर्टनुसार असं म्हटलं जातं की, दाऊद मंदाकिनीच्या सौंदर्यावर फिदा होता. तो मंदाकिनीला त्याच्या आयुष्याची जोडीदार करू इच्छित होता. मंदाकिनीला सिनेमात काम मिळावं यासाठी तो लोकांना धमक्या देऊ लागला. याच कारणामुळे मंदाकिनीला कोणी सिनेमात घ्यायला तयार नव्हतं. निर्मात्यांनी भिती पोटी तिला कोणतीच काम ऑफर केली नाही.

मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात दाऊद इब्राहिमचं नाव जोडलं गेलं होतं. तेव्हा अभिनेत्री मंदाकिनीची देखील चौकशी करण्यात आली होती. 2010मध्ये एका मुलाखतीत मंदाकिनीनं सांगितलं होतं की, ‘दाऊद इब्राहिमबरोबर तिचं नातं होतं. तो तिचा भूतकाळ होता. यामुळे मला खूप त्रास झाला होता’.

हे वाचा:   गरोदर असतानाचा हृदयविकाराच्या झटक्याने पतीचं निधन, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं जगणंही झालं होतं कठीण, म्हणाली, “विधवा स्त्रिया…”

मंदाकिनीनं ‘राम तेरी गंगा मैली’ बरोबरच ‘डान्स डान्स’, ‘लडाई’, ‘कहां है कानून’, ‘नाग नागिन’, ‘प्यार के नाम कुर्बान’, ‘प्यार करके देखो’ अशा अनेक यशस्वी सिनेमांमध्ये काम केलं.

Leave a Reply