दाक्षिणात्य अभिनेता प्रभास हॉस्पिटल मध्ये दाखल,आदिपुरुष चित्रपटाचे शूटिंग पण थांबवले

Uncategorized

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता प्रभास (Prabhas) आणि क्रिती सनॉन हे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा सातत्याने रंगताना दिसत आहे. इतकेच नाही तर पुढच्या महिन्यात प्रभास आणि क्रिती सनॉन हे साखरपुडा करणार असल्याचे सांगितले जातंय. मात्र, अजूनही क्रिती किंवा प्रभास यांनी आपल्या नात्याबद्दल काहीच भाष्य केले नाहीये.

   

आदिपुरुष (Adipurush) चित्रपटाच्या सेटवरच प्रभास आणि क्रिती यांची लव्ह स्टोरी सुरू झाल्याचे सांगितले जातंय. इतके नाही तर हे दोघे लवकरच लग्नबंधणात अडकणार असल्याची चर्चा आहे. चाहते देखील यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहात आहेत. क्रिती सनॉन आणि प्रभासच्या लग्नाच्या चर्चा सुरू असतानाच आदिपुरुषच्या सेटवरून एक मोठी बातमी पुढे येतंय. रिपोर्टनुसार प्रभासची तब्येत खराब झालीये. यामुळे आदिपुरुष या चित्रपटाचे शूटिंग अर्ध्यावरच थांबवण्यात आले असून पुढील काही दिवस प्रभासला आराम करण्याचे डाॅक्टरांकडून सांगण्यात आलायं.

हे वाचा:   अन् संजय दत्त ऋषी कपूर यांना मारहाण करायला घरी पोहोचला होता, नितू कपूर यांनी केली मध्यस्थी

ओम राऊत याच्या दिग्दर्शनाखाली आदिपुरुष हा चित्रपट तयार होतोय. चित्रपटाचे शूटिंग सुरू असतानाच प्रभासची तब्येत खराब झालीये. यामुळे चित्रपटाचे शूटिंग हे अर्ध्यामध्येच थांबवण्याची वेळ आली.

रिपोर्टनुसार प्रभासची तब्येत अचानकच खराब झाली. सर्दी, ताप असल्याने प्रभासला हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यानंतर डाॅक्टरांनी प्रभासला एडमिट करत काही दिवस पूर्णपणे विश्रांती करण्याचा सल्ला दिलाय.

प्रभासची तब्येत खराब झाल्याने आता आदिपुरुष चित्रपटाचे शूटिंग काही दिवसांसाठी थांबण्यात येईल. आदिपुरुष हा चित्रपट बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे.

Leave a Reply