सध्या रिलेशनशिप्समध्ये (Relationships) आपण अनेक गोष्टी पाहत असतो ज्यात कधी काय घडेल काहीच सांगता येतन नाही. कधी खूप चांगल्या गोष्टी घडतील तर कधी अत्यंत वाईट. कधी गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडमध्ये कडाक्याचे भांडणं होईल तर कधी दोघांचे टोकाचे प्रेम पाहून आपल्यालाही हास्याचा झटका येईल.
सध्या असे काही व्हिडीओज आणि पोस्ट (Viral Post) सगळीकडेच व्हायरल होत असतात. त्यामुळे अशा पोस्टकडे पाहून आपल्यालाही कधी कधी खूपच हसायला येते त्यामुळे या पोस्ट्स आणि व्हिडीओज हे सगळीकडेच तुफान व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका पोस्टची सगळीकडेच चर्चा आहे आणि ती म्हणजे एक लव्ह लेटरची.
हे लव्ह लेटर सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधन घेत आहे. आपण आपल्या प्रियकराला किंवा प्रेयसी तिच्या किंवा त्याचा रूसवा फुगवा काढण्यासाठी प्रेमपत्र (Love Letter) लिहून मनवायचा प्रयत्न करतो. आपल्या दोघांमधील रिलेशन हे कायमच चांगले राहवे यासाठी आपण आपल्या जीवाचा आटापीटा कळतो.
नातं किंवा मैत्री म्हटली की आपल्या नात्यात अनेकदा भांडणंही होत असतात. त्यामुळे आपल्यालाही आपल्या पार्टनरला परत मुळ पदावर आणण्यासाठी बराच आटापिटा करावा लागतो. तेव्हा कुठे जाऊन आपल्या पार्टनरचा (Partner) आपल्यावरचा राग जातो. सध्या असेच एक लव्ह लेटर सगळीकडेच व्हायरल होत आहे.
हे लव्ह लेटर वाचून तुम्हालाही हास्याचे फवारे सुटतील. या लव्ह लेटरमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक गर्लफ्रेंड त्याच्या बॉयफ्रेंडला मनवण्याचा प्रयत्न करते आणि त्याच्यासाठी त्याचा राग जावा म्हणून भरपूर विनवण्या करते. परंतु त्या लव्ह लेटरमध्ये वापरलेली भाषा वाचून तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल.
हो, या लव्ह लेटरमध्ये एक नाही तर अनेक भयानक शब्द वापरले गेले आहेत. कधी जानू कधी कबूतर, कधी मुन्ना तर कधी टमाटर असे शब्द ती गर्लफ्रेंड वापरते. त्यामुळे वाचणाऱ्यांची मात्र झोप उडाली आहे.
यात त्या मुलीनं लिहिलंय की, मी तुझ्यावर संशय घेत नाही. पण कोण्या दुसऱ्या मुलीशी तु बोलतोस तेव्हा मला फार त्रास होतो. दुसऱ्या कुठल्या मुलीशी बोलू नकोस. तिच्याकडे पाहून हसूही नकोस. तू रागवू नकोस किंवा गैरसमज करून घेऊ नकोस पण मला फार त्रास होतो. कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करते. खाली तिनं लिहिलंय की, मेरे कबूतर, जानू, राजा, फौजी, टमाटर, रसगुल्ला. आई मिस यू… आपल्या बॉयफ्रेंडला अशा नावानं हाक मारणारी ही कोणीतरी पहिलीच गर्लफ्रेंड असेल.