भारतातील`या` सुंदर बेटावर प्रभास- क्रिती सेनन करणार साखरपुडा?

Uncategorized

‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोस्ट एलिजिबल बॅचरल आहे. गेल्या काही दिवसांत प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन यांच्या (Prabhas and Kriti Sano) नावाची चर्चा रंगली आहे. हे दोघं लवकरच लग्न करणार आहेत, अशी जोरदार चर्चा होती. त्यातच प्रभास आणि क्रिती सेनन पुढच्या आठवड्यात मालदीवच्या आकर्षक ठिकाणी साखरपुडा करणार असल्याची बातमी समोर आली आहे.

   

‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान प्रभास आणि क्रिती सेननची (Prabhas and Kriti Sano) केमिस्ट्री पाहून दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याचं चाहत्यांना वाटलं होतं. प्रभास आणि क्रिती एकमेकांवर प्रेम करत असल्याच्या बातमीही वाऱ्यासारखी पसरली होती.

प्रभासनेही क्रितीला प्रपोज केले असून दोघेही लवकरच लग्न करणार आहेत इथं पर्यंत गोष्ट पोहचली होती. अशातच वृत्तांवर विश्वास ठेवला तर, हे कथित जोडपे लवकरच त्यांच्या नात्याची व लग्नाची घोषणा करणार आहेत.

हे वाचा:   दोन बायका फजिती ऐका! प्रसिद्ध यूट्यूबरच्या दोन्ही पत्नी सोबतच प्रेग्रेंट; फोटोंचा इंटरनेटवर धुमाकूळ

याबाबत माहिती देताना फिल्म इंडस्ट्रीची इनसाईड स्कूप देणारे उमेर संधू यांनी ट्विटमध्ये लिहिले की, #कृतीसनॉन आणि #प्रभास पुढील आठवड्यात मालदीवमध्ये साखरपुडा होईल !! त्यामुळे त्यांच्यासाठी मला खूप आनंद झाला.”    ‘आदिपुरुष’च्या शूटिंगदरम्यान प्रभासने क्रिती सेनॉनला प्रपोज केले होते, याची अधिकृत पुष्टी झाली आहे. दोघे अजूनही रिलेशनशिपमध्ये आहेत आणि लवकरच लग्न करणार आहेत. मात्र, या जोडप्याकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही. 

जेव्हा क्रिती ‘कॉफी विथ करण 7’ (Koffee With Karan) या शोमध्ये दिसली तेव्हा गेमच्या वेळी क्रितीनं सगळ्यात आधी प्रभासला कॉल केला आणि त्याला ‘हे करण इट्स मी’ म्हणाला. याशिवाय क्रिती एका मुलाखतीत म्हणाली की, तिला प्रभाससोबत लग्न करायला आवडेल. (Karan Johar) आतापर्यंत प्रभास आणि क्रितीनं त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. चाहते त्याची आतुरतेने प्रतिक्षा करत पाहत आहेत. 

हे वाचा:   तारक मेहता शोच्या बाघाची खऱ्या आयुष्यातील पत्नी खूपच बोल्ड, पाहा फोटो

तसेच प्रभास आणि क्रिती पहिल्यांदाच (Adipurush) ‘आदिपुरुष’मध्ये एकत्र काम करत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत आहेत. ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून, त्यानंतर सोशल मीडियावर टीझर विरोधात जोरदार टीका झाली आहे. व्हीएफएक्सपासून ते कलाकारांच्या लूकपर्यंत सगळ्याच गोष्टीवर त्यांना ट्रोल करण्यात आलं.

दरम्यान, जे चाहते या चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत. त्यांना अजून थोडा वेळ प्रतिक्षा करावी लागेल. कारण सर्वात आधी हा चित्रपट जानेवारी 2023 मध्ये प्रदर्शित होणार होता, पण आता त्याच्या प्रदर्शनाची तारिख ही बदलून 2023 मध्ये येणार आहे.

Leave a Reply